AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown : राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय.

Maharashtra Lockdown : राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्या, विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
| Updated on: Apr 15, 2021 | 10:04 PM
Share

मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार आता 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. अशावेळी राज्यातील गरीब जनता, हातावर पोट असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एका आर्थिक पॅकेजचीही घोषणा केली आहे. मात्र या पॅकेजमध्ये समाजातील विविध घटकांना काहीच मिळालं नसल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनीही त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हटलं. आता काँग्रेसचे नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. (Vijay Wadettiwar’s letter to Chief Minister Uddhav Thackeray)

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलीय. शिंपी, नाभिक, परीट, लोहार, कुंभार, चांभार, सुतार यांच्यासह उर्वरित बलुतेदारांना मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी विनंती वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. राज्यातील बारा बलुतेदारांच्या हातचा रोजगार हिरावला गेलाय. त्यामुळे त्यांच्या कुटुबांचं पालन पोषण करणंही कठीण होऊन बसलं आहे, असं वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्यामुळे शक्य होईल ती सर्व मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या :

‘कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन

Vijay Wadettiwar’s letter to Chief Minister Uddhav Thackeray

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.