क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत कुणाल जानीनेच एनसीबीला दिली माहिती?

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज यांनी संजय राऊतजी हा व्हिडिओ डिलिट करु नका असे सांगत व्हिडिओतील काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण आहे? कोणत्या पक्षाशी, राजकारण्याशी, सेलिब्रेटीशी, मंत्र्याशी तो संबंधित आहे? असे सवाल विचारले आहेत.

क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत कुणाल जानीनेच एनसीबीला दिली माहिती?
क्रूझ ड्रग्ज पार्टीबाबत कुणाल जानीनेच एनसीबीला दिली माहिती?

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. मात्र या कारवाईनंतर रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केलीय. या व्हिडिओमध्ये केपी गोसावी आर्यनचं कुणाशी तरी बोलणं करुन देताना दिसत आहे. तर शेजारी एक व्यक्ती खुर्चीत आरामात बसलेली दिसत असून ही व्यक्ती कुणाल जानी सारखी दिसत आहे. त्यामुळें एनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच असल्याची माहिती अशी चर्चा सुरु आहे. (Kunal Jani informed the NCB about the cruise drugs party)

संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर करुन चौकशीची मागणी केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही प्रतिवार केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज यांनी संजय राऊतजी हा व्हिडिओ डिलिट करु नका असे सांगत व्हिडिओतील काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण आहे? कोणत्या पक्षाशी, राजकारण्याशी, सेलिब्रेटीशी, मंत्र्याशी तो संबंधित आहे? असे सवाल विचारले आहेत.

कोण आहे कुणाल जानी?

कुणाल जानी हा वांद्र्यातील हॉटेल व्यावसायिक असून मयत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा बिझनेस पार्टनर आहे. तसेच शाहरुख खानसोबतही त्याचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले जाते.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“आर्यन खानच्या केसमधील साक्षीदाराला कोऱ्या कागदावर एनसीबीनं स्वाक्षऱ्या करायला लावल्या, सही करायली लावली हे धक्कादायक आहे.पैशाची मागणी केल्याचेही काही रिपोर्टस आहेत असं समजलं.मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेले की ह्या केसेस या माहारष्ट्राला बदनाम करण्यासाठी आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाराष्ट्र पोलिसांनी याची स्वत:हून दखल घेत चौकशी करावी”, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आर्यन खान के.पी.गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय हा प्रश्न निर्माण झालाय.

एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार : दरेकर

एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओ क्लिपसंदर्भात दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने वागणे चुकीचे वाटते. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये ‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? असा संशयही दरेकर यांनी व्यक्त केलाय.

प्रभाकर साळीचे नेमके आरोप काय?

आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाली होती. त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते, के.पी गोसावी, सॅम, पूजा दादलानीमध्ये डील होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनं केला आहे. 50 लाख के.पी गोसावीसाठी एका व्यक्तीकडून घेतले होते. 38 लाख सॅम यांना दिले होते, तर माझ्याकडून एनसीबीने 9 कागदांवर सह्या घेतल्या असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला. माझ्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचा आरोप देखील प्रभाकर साईल यानं केला आहे.

प्रभाकर साईल कोण?

प्रभाकर साईल हा के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी सह प्रभाकर साळी याचं नाव देखील साक्षीदार म्हणून एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. 12 जुलैपासून प्रभाकर साईल गोसावीचा बॉडीगार्ड आहे. (Kunal Jani informed the NCB about the cruise drugs party)

इतर बातम्या

India vs Pakistan | पाकिस्तानचा विजय, पण धोनी, कोहलीने मन जिंकलं, सामन्यातील ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर खास चर्चा

‘ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय, माझ्याविरोधात कारवाई नको’, समीर वानखेडेंचं पोलिस महासंचालकांना पत्र

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI