
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नवनवीन अपडेट समोर येत आहे. ekyc प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी वडील अथवा पतीचे आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे.या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल. पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक 1500 रुपयांचा हप्ता मिळेल. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाहीतर हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. लाभार्थी महिला योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण करु शकतील.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत
लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. पण सध्या वेबसाईट क्रॅश होत असल्याची तक्रार वाढल्या आहेत. त्यामुळे बहिणी नाराज झाल्या आहेत.
काय आहे प्रक्रिया?
लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या
लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा
आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा
आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा
आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद का. Submit करा
आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे
या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहे
आधार कार्ड
शिधापत्रिका, रेशन कार्ड क्रमांक
वार्षिक 2.50 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र
आधिवास प्रमाणपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र,डोमिसाईल
बँक खात्याची सविस्तर माहिती
लाडक्या बहिणींना 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज
लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलेला 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. सध्या मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे.