
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी, व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार आहे. सरकारने मोठी तयारी केली आहे. महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरातील महिलांना हे आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
उद्योग-व्यवसायासाठी अर्थपुरवठा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आली. या योजनेतंर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्माननिधी देण्यात येतो. DBT मार्फत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा होऊ शकतो. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी हा कर्ज पुरवठा करण्यात येतो.
मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे.
57 महिलांना मदतीचा हात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेमार्फत हे स्तुत्य पाऊल टाकण्यात आले आहे. बँकेने व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. त्या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले. हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.
आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिले. सहकार क्षेत्रातून महिलांच्या सक्षमीकरणाचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
तसेच महिलांना आर्थिक आणि व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी , व्यावसायिक मार्गदर्शन आणि विविध सेवा… pic.twitter.com/82OW9h6K57
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 14, 2025
व्यवसाय कौशल्यासाठी मदत
महिलांना आर्थिक आणि व्यावसायासाठी आर्थिक पाठबळच देण्यात येणार नाही तर या महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन पण करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध सेवा पुरवणाऱ्या ‘मार्केटिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट मल्टी-सर्व्हिस सेंटर’ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यातंर्गत महिलांना विशेष मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी खास महिला कक्ष स्थापन्यात आला आहे. आता राज्यभरात ही सुविधा कधी उपलब्ध होते याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.