AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालाबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार? समुद्रात… कधी होणार विसर्जन? मोठी अपडेट समोर

Lalbaugcha Raja Visarjan 2026: भावपूर्ण वातावरणात निघालेली लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीच्या आसपास पोहोचली आहे. लवकरच विसर्जन होणार असल्यामुळे लाखो भाविकांनी राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालाबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार? समुद्रात... कधी होणार विसर्जन? मोठी अपडेट समोर
lalbagcha RajaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 8:26 AM
Share

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच विसर्जनासाठी गर्दी करतात. ढोल-ताशांच्या गजरात, भावपूर्ण वातावरणात निघालेली लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीच्या आसपास पोहोचली आहे. लवकरच विसर्जन होणार असल्यामुळे लाखो भाविकांनी राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राजाच्या विसर्जनाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गेल्या वर्षी लालबागचा राजा कित्येक तास चौपाटीवर होता. समुद्राला आलेल्या भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. यंदा देखील असेच काहीसे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत माहितीनुसार, आज समुद्राला पहिली ओहोटी पहाटे ०५:२२ वाजता आली आहे. त्यावेळी पाण्याची पातळी केवळ ०.९७ मीटर इतकी होती. ओहोटीच्या काळात समुद्राची पातळी खूप खाली जाते. त्यामुळे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची खोली उपलब्ध होत नाही. गिरीगाव चौपाटी किंवा गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना पाण्याची पातळी पुरेशी असावी लागते. ओहोटी असल्यास मूर्ती समुद्रात सोडणे कठीण होते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका निर्माण होतो.

गेल्या वर्षी 33 तासांनंतर विसर्जन

2025 साली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. मात्र भरतीमुळे अत्याधुनिक तराफा तरंगत राहिला आणि लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या. मंडळाने पाणी ओसरण्याची वाट पाहिली आणि कोळी बांधवांशी चर्चा करून भरतीदरम्यान विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला.

लालाबागचा राजा हा मुंबईचा सांस्कृतिक वारसा आहे. त्याच्या विसर्जनाला लाखो लोकांचे भावविश्व जोडलेले आहे. ओहोटीसारख्या नैसर्गिक घटकांमुळे अडचणी येणे स्वाभाविक आहे. मात्र प्रशासन, स्वयंसेवक आणि भाविक यांच्या सहकार्याने विसर्जन सुरक्षितपणे पूर्ण होईल, अशी आशा आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार