Loksabha Election 2024 | लोकसभेच्या निवडणुकीचा नारळ फुटला, पण जागा वाटपाचा पेच कायम, पुन्हा बैठकांचे सत्र

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक 2024 चा बिगूल वाजला आहे. पण महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नही. आज दिल्लीत शिवसेना, भाजप आणि एनसीपी प्रमुख नेत्यांची हा बैठक होणार आहे. मुंबईतही मार्ग काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.

Loksabha Election 2024 | लोकसभेच्या निवडणुकीचा नारळ फुटला, पण जागा वाटपाचा पेच कायम, पुन्हा बैठकांचे सत्र
महायुती
| Edited By: | Updated on: Mar 19, 2024 | 10:22 AM

मुंबई | 19 March 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चा बिगूल वाजला आहे. पण महायुतीच्या जागा वाटपाचे त्रांगडे काही सुटलेले नाही. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत त्यावर तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच महायुतीत मनसेच्या रुपाने नवीन खेळाडू सहभागी होण्याची चर्चा पण रंगली आहे. राज ठाकरे हे महायुतीत सामील होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मुंबईतही मार्ग काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. मुंबईत बैठकांचे सत्र सुरु आहे.

आज दिल्लीत बैठक

राज्यातील लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अवघ्या काही जागांवर अडले आहेत. महायुतीच्या 42 जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर सहा जागांवर एकमत होत नसल्याचे समोर येत आहे. आता मनसे पण युतीत आल्यास जागा वाटपाचे काय धोरण असेल, यावर खलबत होऊ शकतात. जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या प्रमुखांची आज बैठक होणार असल्याचे समोर येत आहे.

शिवसेना १६ जागा लढवण्यावर ठाम

शिवसेनेनं भाजपकडे १८ जागांची मागणी केली होती. शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून भाजप – सेनेत रस्सीखेच सुरु आहे. वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. मुंबईत शिवसेनेला २ जागा आणि भाजपला ४ जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत बैठकांचे सत्र

दिल्लीसह मुंबईत भाजपच्या बैठकांचे सत्र हे सुरूच आहे. मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा अजून कायम आहे. त्यासाठी भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची बैठक आहे. आज यावर बैठक होणार आहे. आशिष शेलार यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदार यांना या बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील तीन जागांबाबत अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यासाठी रोज नवनवीन चेहऱ्यांची चर्चा होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.

एकनाथ शिंदेंचे कोण आहेत माजी खासदार ?

  • श्रीकांत शिंदे – कल्याण
  • राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई
  • हेमंत पाटील – हिंगोली
  • प्रतापराव जाधव – बुलडाणा
  • कृपाल तुमाणे – रामटेक
  • भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
  • श्रीरंग बारणे – मावळ
  • संजय मंडलिक – कोल्हापूर
  • धैर्यशील माने – हातकणंगले
  • सदाशिव लोखंडे – शिर्डी
  • हेमंत गोडसे – नाशिक
  • राजेंद्र गावित – पालघर
  • गजानन कीर्तीकर – उत्तर पश्चिम मुंबई