प्रियकर-प्रेयसीला भेटवण्याच्या नावे लाखोंचा गंडा, लव्हगुरुला मुंबई पोलिसांच्या बेड्या

| Updated on: Jan 29, 2020 | 7:24 AM

प्रेमात धोका मिळालेल्या प्रियकर-प्रेयसीला भेटवण्याचा दावा करणाऱ्या लव्ह गुरुला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमात धोका मिळालेल्या प्रेमींना सल्ला देण्याच्या नावावर हा लव्ह गुरु लोकांना लुटण्याचं काम करत असल्याचा आरोप आहे.

प्रियकर-प्रेयसीला भेटवण्याच्या नावे लाखोंचा गंडा, लव्हगुरुला मुंबई पोलिसांच्या बेड्या
ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरांचा नवा फंडा
Follow us on

मुंबई : प्रेमात धोका मिळालेल्या प्रियकर-प्रेयसीला भेटवण्याचा दावा करणाऱ्या लव्ह गुरुला पोलिसांनी अटक केली आहे (Love Guru). प्रेमात धोका मिळालेल्या प्रेमींना सल्ला देण्याच्या नावावर हा लव्ह गुरु लोकांना लुटण्याचं काम करत असल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी गोरेगाव पूर्वच्या लोटस पार्क बिझनेस हबमधील एका ऑफिसमध्ये मॅनेजर आहे. काही दिवसांपासून तिचा प्रियकर तिच्याशी बोलत नव्हता. मात्र, तरुणीचं त्याच्यावर खूप प्रेम होतं, तिला तो हवा होता (Online Fraud). यादरम्यान, तिच्या मोबाईलवर लव्ह गुरुचा मेसेज आला. तिने मेसेजमध्ये दिलेल्या www.famousloveproblemsolutions.com या वेबसाईटवर क्लिक केलं. त्यानंतर लगेच तिला फोन आला.

तरुणीची समस्या ऐकल्यानंतर या लव्ह गुरुने तिला काही पूजा आणि हवन करण्याचा सल्ला दिला. हे केल्याने तिला तिचं प्रेम मिळेल, असा दावा त्याने केला. त्यानंतर तिला राजस्थानमधील सीकरच्या आयसीआयसीआय बँकेचा खाते क्रमांक देऊन त्यात दहा हजार ट्रान्सफर करण्यास सांगितलं.

पुजा आणि हवनच्या नावावर आतापर्यंत या लव्ह गुरुने वेगवेगळ्या महिलांकडून 45 हजार, 30 हजार, 1 लाख रुपयांपर्यंत पैसे उकळायचा, असा आरोप आहे.

लव्ह गुरु त्या तरुणीला पुजा आणि हवन केल्याचे खोटे फोटोही व्हॉट्सअॅप करायचा. मात्र, इतकं सगळ करुनही तिला तिचा प्रियकर मिळाला नाही. त्यानंतर लव्ह गुरुने शेवटच्या प्रयत्नासाठी 76 हजार रुपये खात्यात जमा करण्यास सांगितले. तिने तिच्या भावाच्या खात्यातून हे पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर भावाने तिला याबाबत विचारणा केली, तेव्हा तिने सारी हकिगत सांगितली. हे ऐकताच तिचा भाऊ तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि त्या लव्ह गुरुबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी लव्ह गुरुविरोधात कलम 420, 34 तसेच आयटी अॅक्ट 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत लव्ह गुरु निखिल कुमार सुरेश कुमार भार्गवला (वय 27) राजस्थानच्या सीकरीमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराच्या आशेने मध्य प्रदेशच्या एका तरुणीने 40 हजार, तर काहींनी 1 लाख रुपयांपेक्षी जास्त पैसे या लव्ह गुरुच्या खात्यात ट्रान्सफर केले. या लव्ह गुरुच्या खात्यात जवळपास 10 लाख रुपये आढळून आले. पोलिसांनी हे सर्व पैसे सीज केले आहेत.