AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

चौथ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमुळं राज्य सरकारसमोरील चिंता कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे. Maharashtra Unlock level

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?
महाराष्ट्र 5 लेव्हल अनलॉक
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 14, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या 5 स्तरांच्या नियमावलीत आजपासून बदल होणार आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन नियमांत बदल केले जातील, असं सरकारनं आधीच सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असेल आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले असतील, अशा जिल्ह्याचा समावेश पहिल्या लेव्हलमध्ये करण्यात आला असून त्यामधील जिल्ह्यांतील निर्बंधाबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त निर्णय जाहीर करतील. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार अशा जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे.(Maharashtra 5 level unlock know your district in which level as per corona positivity rate and oxygen bed occupancy)

पहिल्या लेवलचे निर्बध कुठल्या जिल्ह्यात ?

अहमदनगर , जळगाव , धुळे , पऱभणी , नांदेड ,जालना लातूर अमरातवती , यवतमाळ , वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोदीया

दुस-या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

नंदुरबार , हिंगोली

तिस-या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , पालघर , नाशिक – सोलापूर. सांगली , औरंगाबाद , बीड अकोला बुलढाणा , गडचिरोली

चौथ्या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?

रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर , सातारा

कुठल्या महानगरपालिका कुठल्या लेवलमध्ये ?

पहिली लेवल

सोलापूर औरंगाबाद नागपूर

दुसरी लेवल

ठाणे नवी मुंबई वसई – विरार पुणे

तिसरी लेवल

मुंबई कल्याण नाशिक पिपंरी चिचंवड

?पाच लेव्हल कशा आहेत??

?पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत. ?दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

?तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

?चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

?पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

दरम्यान, चौथ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमुळं राज्य सरकारसमोरील चिंता कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे. प्रशासनाला या जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सातारा, कोल्हापूर, रायगड  हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तर, पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी डेंजर झोनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या:

मुंबई मनपाकडून खासगी लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत किती?

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

(Maharashtra 5 level unlock know your district in which level as per corona positivity rate and oxygen bed occupancy)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ