AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज

Exit Poll Results 2024 Maharashtra Mahayuti vs Mahavikas Aaghadi : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जाणून घ्या कोणत्या पक्षाच्या किता जागा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे?

Exit Poll Results 2024 Maharashtra : मविआ आणि महायुतीतला मोठा भाऊ कोण? एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार? पाहा अंदाज
| Updated on: Nov 20, 2024 | 8:35 PM
Share

राज्यातील एकूण 288 मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्यातील मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि जनतेला 23 नोव्हेंबरची प्रतिक्षा लागून आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येईल? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत काय अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.

मविआ अर्थात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे 3 पक्ष आहेत. तर महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. आतापर्यंत इलेक्टोरल एज, पोल डायरी, चाणक्य स्ट्रेटेजीस, मॅट्रिझ आणि पी मॉक्यू यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनुसार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.

इलेक्टोरल एजचा एक्झिट पोल

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, मविआला सत्ता स्थापनेची सर्वाधिक संधी आहे. या पोलमध्ये मविआला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मविआमध्ये काँग्रेस आणि महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इलेक्टोरल एज पक्षनिहाय अंदाज

महायुती – 118

  • भाजप – 78
  • शिंदे सेना – 26
  • अजित पवार – 14

मविआ -150

  1. काँग्रेस – 60
  2. ठाकरे गट – 44
  3. शरद पवार गट – 46

इतर – 20

पोल डायरीचा अंदाज काय?

पोल डायरीच्या एक्झीट पोलनुसार, महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज आहे. महायुतीला 122 ते186 उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मविआचे 69 ते 121 पर्यंत जागा येण्याचा अंदाज आहे.

पोल डायरीच्या पोलनुसार पक्षनिहाय आकडे

महायुती – 122 ते186

  • भाजप – 77 ते 108
  • शिंदे सेना – 27 ते 50
  • अजित पवार – 18 ते 28

मविआ 69-121

  • काँग्रेस – 28-47
  • ठाकरे सेना – 16- 35
  • शरद पवार गट – 25-39

इतर 12 ते 29

मॅट्रिझ एक्झीट पोलचा अंदाज

मॅट्रिझ एक्झीट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतील सहज मॅजिक फिगर गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआच्या 110 ते 130 उमेदवार जिंकण्याची शक्यता या एक्झीट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

महायुती – 150 ते 170

  • भाजप – 89-101
  • शिंदे सेना – 37-45
  • अजित पवार – 17-26

मविआ – 110 ते 130

  • काँग्रेस – 39-47
  • ठाकरे सेना – 21-39
  • शरद पवार 35-43

इतर  8-10

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?