आधी दुबार मतदार, नंतर पाडू मशीन अन् आता शाईऐवजी… निवडणूक आयोगाचा गोंधळ संपता संपेना, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात मार्कर शाईवरून वाद निर्माण झाला आहे.

आधी दुबार मतदार, नंतर पाडू मशीन अन् आता शाईऐवजी... निवडणूक आयोगाचा गोंधळ संपता संपेना, नेमकं काय घडतंय?
voting ink
| Updated on: Jan 15, 2026 | 12:25 PM

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांचा निवडणुकीचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह ठिकठिकाणी राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनचा गोंधळ व्हायचा. पण आता थेट मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईचा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडतंय?

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईतील अनेक मतदारांच्या बोटावर लावलेली शाई किंवा मार्करची खूण सहज पुसली जात असल्याची तक्रारी समोर येत आहेत. मुंबई आणि पुण्यातील अनेक प्रभागातील मतदार या तक्रारी करत आहेत. दरवर्षी मतदार मतदान केंद्रावर गेल्यावर त्याला एका विशिष्ट शाईची खूण लावली जाते. मात्र आता यंदा एका मार्करच्या सहाय्याने बोटावर ही खूण केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बोटावर मार्करच्या सहाय्याने करण्यात आलेली ही खूण अगदी सहजरित्या पुसली जात असल्याची तक्रार मतदार करत आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Live

Municipal Election 2026

03:28 PM

Maharashtra Municipal Election 2026 : आशिष शेलार यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच थेट सांगितला निकाल...

03:23 PM

त्यांच्या बुद्धीत हेराफेरी, थेट उद्धव ठाकरे यांच्यावर यांच्यावर संतापले आशिष शेलार..

03:00 PM

शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

02:47 PM

BMC Election 2026 Voting : गोरेगावमध्ये बुथ सापडत नसल्याची मतदारांची तक्रार

03:25 PM

Maharashtra Election Voting Percentage : छत्रपती संभाजीनगर : दुपारी 1:30 पर्यंत 30.19 टक्के मतदान

03:10 PM

उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा आढवा

मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण काय?

आता याप्रकरणी मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२६ साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. तसेच,महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही वृत्तात सांगितले जात आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याबाबत माननीय महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे, माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे भूषण गगराणी यांनी म्हटले आहे.

तसेच मनसे नेते साईनाथ दुर्गे यांनीही याबाबत कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर कोल्हापुरातही अशाच तक्रारींमुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या २०१२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे मार्कर वापरले जात आहेत, असे सांगितले आहे. त्यामुळे आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मालेगावात 800 हून अधिक मतदार कार्ड जप्त

मालेगावमध्ये एकाच ठिकाणी ८०० पेक्षा जास्त मतदार कार्डे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मतदान केंद्राला लागूनच असलेल्या एका घरात ही कार्डे असल्याचे समोर आल्यावर प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. ही कार्डे बोगस असल्याचा संशय व्यक्त होत असून, उमेदवारांनी जागीच पंचनामा करण्याची मागणी लावून धरली आहे. निवडणूक अधिकारी सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

काय आहे पाडू यंत्राचा वाद?

निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी ‘प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट’ (PADU) नावाचे नवीन मशीन आणले आहे. ईव्हीएमला बॅकअप म्हणून वापरल्या जाणाऱ्या या यंत्राबद्दल राजकीय नेत्यांनी, विशेषतः राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. आधी कधीही न वापरलेले हे यंत्र आताच का आणले? असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. तसेच, ऐन मतदानाच्या दिवशी माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयामुळे आयोगाच्या भूमिकेबद्दल संशय अधिक गडद झाला आहे.