
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
वसई :
वसईच्या जुन्या अंबाडी ब्रिजवर अनधिकृत प्रवेश करणाऱ्या आयसर टेम्पोचा अपघात झाला आहे
आज रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे.
जुना अंबाडी पुल कमकुवत असल्याने अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी लोखंडी पोल लावण्यात आले आहेत
आयसर टेम्पो चालकाला ही घटना लक्षात न आल्याने त्याने आपला टेम्पो चक्क ब्रिजवर घातल्याने लोखंडी पोलला अडकून टेम्पोचा वरचा टप हा तुटून चेंदामेंदा झाला आहे
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे.
जळगाव :
जळगावात महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली
मानराज पार्क जवळील रेल्वे पुलावर घडला अपघात
महामार्गावर दुपारी काही अंतरावर कारला लागली होती आग
ट्रकला आग लागल्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली
ट्रकमध्ये धान्य भरण्याचे खाली पोत्यांचे गठ्ठे असल्याने लागली मोठी आग
अग्निशमन दलाची गाडी उशिराने येऊन देखील आग विझली नाही
नवी दिल्ली :
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज
एम्स रुग्णालयामधून मिळाला डिस्चार्ज
बुलडाणा :
स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांच्यासह 2200 ते 2500 लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल,
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांत गुन्हे दाखल,
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज रविकांत तुपकरांनी काढला होता मोर्चा,
पुण्याच्या बालेवाडी परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जण जखमी झाल्याची घटना घडलीय होती
ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
या प्रकरणी वाकड पोलिसांकडून इमारत 2 इंजिनिअर आणि 1 सुपरवायझर यांच्यावर वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय
-साईराज बिल्डकॉन सिनियर इंजिनिअर देवेंद्र गायकवाड तसेच ज्युनिअर इंजिनिअर अजय ढगे,साईड सुपरवायझर तरुण मालदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे
कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयची पहिली अटक, मध्यस्थी असलेल्या संतोष जगतापला अटक, संतोष जगतापला ठाण्यातून अटक
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आलापल्ली या भागात भूकंपाचे सौम्य झटके
अहेरी तालुक्यातील आहेरी आलापल्ली गोमणी आणि राजाराम परिसरात भूकंपाचे धक्के, 40 ते 50 सेकंद सर्व नागरिकांना जाणवले धक्के
आघाप जिल्हा प्रशासनाकडे याची कोणतीही माहिती नाही, परंतु अनेक घरांत असलेल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले
हा भाग महाराष्ट्र राज्यात येत असला तरी तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील सीमावर्ती भागात आहे
कागजनगर भागात कोल फॅक्टरीज असल्यामुळे इथून कोल कोळसा काढला जातो
येथील काही परिणाम असावा असाही एक अंदाज नागरिकांकडून लावला जात आहे
पुणे :
दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर
मंडई, लक्ष्मी रोड, तुळशीबागेत खरेदीसाठी मोठी गर्दी
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुणेकर साजरी करणार पहिली दिवाळी
पुणे :
आज आरोग्य विभागाचा गट – ‘ड’च्या पेपरमध्येही गोंधळ
गट ‘ड’चा पेपरही फुटल्याची विद्यार्थ्यांचा आरोप
काही ठिकाणी पेपरच्या गठ्ठयाचे सील तुटलेले होते.
गट -क चा अनुभव असताना. गट -ड ची परीक्षा तरी सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना. गट – डच्या पेपरमध्ये पण पेपर फुटीचा प्रकार आला समोर
राज्यात 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता
मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता
1 नोव्हेंबर पासून पुढील चार दिवस पाऊस पडू शकतो
हवामान विभागाचा अंदाज
कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात प्रभाव असेल
दक्षिण कोकणमध्ये सुद्धा पावसाची शक्यता
– नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी
– दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड
– नागरिकांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर
– मास्क न घालताच अनेक नागरिक बाजारात
– नाशिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज
मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची वानखेडे कुटुंबासोबत बैठक सुरु, रोजच्या आरोपांमुळे कुटुंबियांना त्रास, आरोपांबाबत तोडगा काढा, समीर वानखेडेंची विनंती,
पुणे :
नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात, जीवितहानी नाही, ठोस उपाययोजना करण्याची मागणी
मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळील भूमकर पुल परिसरात आज दुपारी पुन्हा अपघात
एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रेनची बोगी घेऊन निघालेल्या कंटेनरला धडक दिली.
या विचित्र चार वाहनांचे मोठे नुकसान
पुणे :
– पुण्यात दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
– दिवसभरात ५९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ११२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
-१२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०४२१५.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७३९.
– एकूण मृत्यू -९०७४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९४४०२.
खासदार विनायक राऊत यांचं सिंधुदुर्गवासीयांना जागृत आणि सावध राहण्याचे आवाहन. नारायण राणेंची रक्तरंजित राजकारण करण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यापासून जिल्हावासीयांनी सावध राहावं. सात वर्षात शांत असलेला जिल्हा पुन्हा लालभडक रक्ताने माखला जावा अशी राणेंची इच्छा. श्रीधर नाईक ते मनचेकर, अंकुश राणे हे सगळे खून राजकारणातून झाले. तसं पुन्हा सुरू करण्याची असुरी इच्छा नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची असल्याचे विनायक राऊत यांचे खळबळजनक विधान
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिंहा यांच्या पत्नी पूनम सिन्हा आज शाहरुख खानच्या घरी मन्नतवर दाखल झाल्या. २८ दिवसांनंतर आर्यन खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर पूनम सिन्हा यांनी मन्नतवर येवून शाहरुख खान कुटुंबाला भेट दिली.
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया :
आदित्य आणि विश्वजीतचे काम कौतुकास्पद
राज्याचे नेतृत्व करतात तसे देशाचेही करतील
दंडकारण्य अभियानात लोकसहभाग मोठा
२० वर्षानंतर नाही तर ५ वर्षानंतर आपण याच लावलेल्या झाडाखाली कार्यक्रम घेऊ
या डोंगराला हर्मल हिल असे नामकरण
महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांना सोबत घेऊन काम करतातय
पहिल्याच बैठकीत कर्जमाफी देवून सर्व जाचक अटी काढून सोप्या मार्गाने २ लाखांपर्यत कर्जमाफी
कोविडमुळे पुढील कर्जमाफी थांबलीय, लवकरच तीही करू
कोरोनात सर्वात चांगले काम राज्याचे
आकडे देखील खरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देशभरातून झालेल्या सर्व्हेत वरच्या स्थानी नाव
अडचणी आल्या मात्र विकास थांबला नाही
अनेक स्वप्न पाहता, देव बुडवून बसले, झोपेत बडबडतायत
मात्र आमची आघाडी भक्कम आहे पुढेही राहील
विश्वजीतकडे किती खाते हे ते एका दमात सांगता येणार नाही
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री म्हणतात, दिवंगत इंदिराजींनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. देशाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आणि एकात्म, बलशाली राष्ट्र उभारणीचा आपण संकल्प करूया.’
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ थांबता थांबेना
जळगावात आज पार पडणाऱ्या गट ड संवर्गातील परीक्षेदरम्यान, एकाच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दोन प्रकारचे परीक्षा क्रमांकाचे हॉल तिकीट, नेमक्या कोणत्या परीक्षा क्रमांकावर पेपर द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
ऐनवेळी परीक्षा केंद्र व परीक्षा क्रमांक बदलल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप, विद्यार्थीवर्गातून राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी
परीक्षा कंडक्ट करणाऱ्या एजन्सीकडून चूक झाल्याची यंत्रणेची माहिती
राज्यभरात अशाच प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना अडचण आल्याची शक्यता
पुण्यात पुढच्या निवडणूकीत महापौर राष्ट्रवादीचा
निवडणुकीच्या कामाला लागा
अजित दादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू
केंद्र सरकारने दिवाळी नाही दिवाळ काढलं
2024 ला आपल्याला काही बदल करता येईल
सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
I’ve tested positive for #COVID19
I’m fine n have isolated myself in home quarantine. Requesting everyone who came in contact with me to get tested immediately.
Also humbly request all you lovely people to take care of yourselves during the Diwali festivities ??— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) October 31, 2021
क्रांती रेडकर रामदास आठवले यांच्या भेटीला
रामदास आठवलेंकडून आम्हाला अपेक्षा, क्रांती रेडकर आशावादी
मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही- क्रांती रेडकर
क्रांती रेडकरने मला सगळी कागदपत्रे दाखवली
समीर वानखेडे यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं हे खरंय पण ते जन्माने दलित
समीर आणि क्रांतीचं लग्न 2016 मध्ये
नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा, त्याचं कारण मलिकांचा जावई 8 महिने तुरुंगात
समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी
उच्चशिक्षित, चांगला अधिकारी, त्याला बदनाम करण्याचं काम सुरु
आर्यन खानच्या केसमध्ये जर त्या 19 लोकांकडे ड्रग्ज मिळालं नाही, त्यांनी सेवन केलं नाही, तर कोर्टाने 21 दिवस जामीन का दिला नाही
मी धर्मांतर करणार नाही
मी कागदपत्रे सादर करणार
मलिकांचे सर्व आरोप खोटे
मलिकांनी आमची बदनामी थांबवावी
दिवाळीनंतर फटाके फोडणार,
वसुली करण्याचं ठाकरे सरकारचं पाप
महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणार
मंत्र्यांकडून जावयांना खूश करण्याचं काम
नवाब मलिक रोज उठून आरोप करतात
राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते, मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला,
रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले
या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे,
त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अश्या सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे,
पुण्यातून दिवाळीला गावी जाण्यासाठी 381 ज्यादा गाड्यांच महामंडळाकडून नियोजन,
स्वारगटे , पिंपरी ,शिवाजीनगर , या आगारातून सुटणार ज्यादा बसेस,
कोकण, विदर्भ, मराठवाड्यात , खान्देशात जाण्यासाठी अतिरिक्त बसेसची सोय,
दिवाळीसाठी गाड्यांच बुकींग फुल्ल झालंय, त्यामुळे ज्यादा गाड्या सोडण्याचं नियोजन,
प्रवासी आरक्षित गाड्या कालपासून सोडायला सुरुवात
मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे.
गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले.
त्यांच्या व्हायोलिनचे सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ सुप्रसिद्ध संगीतकार व व्हायोलिन वादक श्री . प्रभाकर जोग यांचे आज सकाळी ८ वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले .
दुपारी 11 ते 2 त्यांच्या राहत्या घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
2 वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल.
समीर वानखेडे जन्माने मुस्लिम, नवाब मलिक यांचा दावा
मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम
संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते
नोकरीसाठी नाव बदलण्याचं काम केलं
दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केलं
वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची योग्य पडताळणी व्हावी
वानखेडेंनी खोटेपणाने नोकरी मिळवली
सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे , राज्यमंत्री विश्वजीत कदम आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्याला उपस्थिती
दंडकारण्य अभियान ही वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची व्यापक चळवळ
शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसुलीचा निर्णय आधीचाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्पष्टीकरण
-एक रककमी FRP च्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचा उद्या कराड तहसिलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
-माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघणार
-गावोगावी शेतकरी बैठकांचे सत्र सुरु
निवडणुकीबाबतच वक्तव्य माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना भोवणार
क्षीरसागर यांच्या वक्तव्याविरोधात आम आदमी पक्षाची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
क्षीरसागर यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्या
आपचे संदीप देसाई यांची मागणी
आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करणार असल्याचं शिरसागर यांनी केलं होतं
दुचाकी धारकांची चिंता वाढवणारी बातमी
विना हेल्मेट दुचाकी चालवणे आता पडणार दुपट महागात
विना हेल्मेट बाईक चालवल्यास तब्बल 1 हजाराचा दंड
औरंगाबादसह संपूर्ण राज्यात विना हेल्मेट दंड वाढवण्याचा निर्णय
विना हेल्मेट सध्या आहे 500 रुपये दंड मात्र पुढील आठवड्यात होणार 1 हजार रुपये दंड
परिवहन विभागाने घेतला दंड दुप्पट करण्याचा निर्णय
सोलापूर मिठाई व्यवसायिकांना बेस्ट बिफोर शिक्का बंधन कारक
शिक्का न दिसल्यास कारवाईचा इशारा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळाच्या पदार्थांना असते मोठी मागणी
मिठाई ,फराळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना परवाना व नोंदणी करूनच व्यवसाय करावा
मिठाई विक्रेत्याने मिठाई बॉक्सवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक
अन्यथा कारवाई करण्याचा अन्न औषध प्रशासन विभागाचा इशारा
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले
आगामी महानगरपालिका निवडणुकीत साम दाम दंड भेद नितीचा वापर करू
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच वक्तव्य
त्रिसदस्यीय प्रभाग समितीमुळे घोडा बाजाराला आळा बसणार
त्यामुळं यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सरशी होणार
क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास
दिवाळीच्या तोंडावर राज्यात वीजटंचाई होणार नाही
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आश्वासन
केंद्र सरकार वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार
एकीकडे राज्य सरकार वीज विकतं आणि वीज नाही म्हणतं हे चुकीचं
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा कोळसा टंचाईवरून राज्य सरकारला टोला
केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहीलं होतं
3 हजार रुपये थकबाकी केंद्राची राज्याकडे आहे
केंद्रानं कोळशाचा पुरवठा थांबवला नाही
राज्य सरकारने कोळशाचा साठ केला नाही. म्हणून कोळशाची टंचाई
देशात कोळशाची टंचाई नाही
बेळगावात काळ्या दिनाला परवानगी द्यायला कर्नाटक प्रशासनाची टाळाटाळ
कोरोनाच कारण देत पोलिसांनी आपत्ती निवारण समितीकडे दाखवलं बोट
परवानगीसाठी प्रशासनाचं वेळ काढून धोरण
अद्याप परवानगी नसल्यानं महाराष्ट्र एकीकरण समिती मूक फेरी ऐवजी निषेध सभा घेणार
मराठा मंदिरात उद्या होणार निषेध सभा
– नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होऊ घातलेल्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध
– प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकरी पालकमंत्र्यांच्या दरबारी
– मखमलाबाद,हनुमानवडी येथील साडेसातशे एकरवरील प्रस्तावित प्रकल्प
– या विरोधात आधीच 16 शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीये
– त्यामुळे प्रकल्प रद्द झालाच तर मनपात सत्ताधारी असलेल्या भाजपला मोठा धक्का बसणार आहे
– नाशिक शहरात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सुरू केलेली अनधिकृत होर्डिंगस हटाव मोहीम सुरूच..
– गेल्या आठवडा भरात 413 होर्डिंगस हटवले
– पोलीस परवानगी न घेतलेल्या होर्डिंगसवर होतीये कारवाई
– मात्र मनपातील कर विभाग यबाबत अंधारात,होर्डिंगसची माहिती या विभागाकडे नसल्याचं आलं समोर
महागाईच्या विरोधात शिवसेना आणि युवा सेना उतरणार रस्त्यावर
सायकल रॅली काढत उतरणार रस्त्यावर
रामटेक चे खासदार कृपाल तुमाणे यांच्या नेतृत्वात करणार केंद सरकार विरोधात आंदोलन
वाडी परिसरातून होणार आंदोलनाची सुरवाची सुरवात
औरंगाबाद शहरातील अनधिकृत घर धारकांसाठी मोठी बातमी
अनधिकृत आणि गुंठेवारीतील घरे अधिकृत करण्यासाठी मिळाली मुदतवाढ
30 नोव्हेंबर पर्यंत अनधिकृत घरे अधिकृत करण्याची दिली परवानगी
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली घरे अधिकृत करण्यासाठी परवानगी
30 नोव्हेंबर पर्यंत घरे अधिकृत नाही केली तर मग फिरवला जाणार बुलडोझर
हार्बर मार्गावर काय स्थिती?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल अणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक्स आवश्यक आहेत. रेल्वे प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.