गोरेगावातील पत्राचाळीचा विकास, मराठावाडा वॉटरग्रीडच्या कामाला पैठणपासून सुरुवात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास २९७ कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

गोरेगावातील पत्राचाळीचा विकास,  मराठावाडा वॉटरग्रीडच्या कामाला पैठणपासून सुरुवात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 7:08 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारच्या कॅबिनेटची बैठक आज पार पडली या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास 297 कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे. प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.  (Maharashtra Cabinet Meeting Uddhav Thackeray council of Minister take decision of developing Goregaon Patra Chawl, starting of Marathawada Water greed Jalna Hatwan Project and Prime Minister Agri Irrigation scheme)

नवी मुंबई विमानतळाच्या विकासकाची मालकी अदानी समुहाकडे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकाची मालकी अदानी समुहाकडे देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वस्तू व सेवा कर कायद्यात सुधारणा

करदाते व वस्तू व सेवा कर विभाग यांच्यातील वाद कमी करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, २०२१ प्रख्यापित करण्यात येणार आहे.

गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास

मुंबईच्या गोरेगांवमधील पत्राचाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहेत. कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मराठवाडा पिण्याच्या पाण्याच्या ग्रीडचं काम पैठणपासून सुरु

मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची ग्रीड टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. पैठणपासून कामाला सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पत्रा चाळीचा विकास म्हाडा करणार

पत्रा चाळीचा विकास आता बिल्डर ऐवजी म्हाडा स्वतः करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  गेल्या दहा वर्षापासून असणाऱ्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.  स्थानिकांच्या आंदोलनानंतर स्वतः विकास करण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे.

दोन वर्षात घरे मिळणार

सन 2008 पासून रखडलेला सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) याच्या पुनर्विकासाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली. 672 मूळ रहिवाशांना पुढच्या 2 वर्षांत घरे मिळतील. गोरगरीबांची सेवा करण्याची ही संधी मला मिळाली. लवकरात लवकर ते त्यांच्या घरात जातील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईन, असं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक पुढे ढकलली जाणार? राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार

(Maharashtra Cabinet Meeting Uddhav Thackeray council of Minister take decision of developing Goregaon Patra Chawl, starting of Marathawada Water greed Jalna Hatwan Project and Prime Minister Agri Irrigation scheme)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.