Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, राज्यात 2 कोरोना रुग्ण दगावले!

| Updated on: Jun 13, 2022 | 10:03 AM

मुंबईनंतर ठाण्याचा कोरोना रुग्णांमध्ये क्रमांक लागत असला तरी, त्यानंतर पुण्याचा नंबर लागत आहे. आजचा पुण्यातील आकडा आहे.1128 इतका आहे.

Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, राज्यात 2 कोरोना रुग्ण दगावले!
कोरोना अपडेट
Follow us on

मुंबईः राज्यात रविवारी कोरोनाचे (Corona) 16,370 रुग्ण सक्रिय असून राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी ही 2,946 एवढी आहे. तर रविवारी राज्यात कोरोनाने दोन रुग्ण दगावले (Two Death) असल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील सगळ्यात जास्त रूग्ण हे मुंबई शहरात (Mumbai City Corona update) असून 1,889 रुग्ण हे एका मुंबईत आहेत, तर याआधी 19573 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1432 जणांना डिस्जार्ज मिळाला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 2946 नवे रुग्ण राज्यात झाले आहे. तर आरोग्य विभागाने 8,13,21,768 रुग्णांची टेस्ट केली होती. त्यापैकी 79,10,577 रुग्णांची टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे.

कोरोना रुण्गांची संख्या ही 16,370

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आले आहे. राज्यातील एकूण कोरोना रुण्गांची संख्या ही 16,370 इतकी झाली आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त ही मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही ही संख्या मोठी वाढत आहे.

मुंबईनंतर पुण्याचा नंबर

मुंबईनंतर ठाण्याचा कोरोना रुग्णांमध्ये क्रमांक लागत असला तरी, त्यानंतर पुण्याचा नंबर लागत आहे. आजचा पुण्यातील आकडा आहे.1128 इतका आहे.

मृत्यूचे प्रमाण कमी

मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरमध्ये रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असली तरी सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. रायगड जिल्ह्यातही 530 पेक्षा रुग्ण जास्त असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कमी कोरोना

तर राज्यात आज सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या सापडली आहे ती, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजची कोल्हापूरातील आकडेवारी ही 5 असून गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मात्र 5904 एवढा गंभीर आहे.

देशातील कोरोना रूग्णांची संख्या

भारतात गेल्या 24 तासात 8,582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलीये. संसर्ग वाढत असताना, देशात सक्रिय कोरोना केसेस 44,513 आहेत.  जे भारतातील एकूण पॉझिटिव्ह केसेसपैकी 0.06 टक्के आहे. गेल्या 24 तासात 3,16,179 कोविड 19 चाचण्या घेण्यात आल्याने दैनंदिन सकारात्मकता दर 2.71 टक्के नोंदवला गेला आहे.