AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Rules : कोरोना रुग्ण घटल्यानं ठाकरे सरकारची नवी नियमावली, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, वाचा एका क्लिकवर

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय त्यांना दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Corona Rules : कोरोना रुग्ण घटल्यानं ठाकरे सरकारची नवी नियमावली, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद, वाचा एका क्लिकवर
ताडोबा हे जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे यासाठी आराखडा तयार करा : मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 6:48 AM
Share

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (MVA Government) डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध (Corona Restrictions ) लागू केले होते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे.

काय सुरु होणार?

राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना दिलासा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्या जिल्ह्यातील 90% लोकांचा पहिला डोस पूर्ण हवे आहेत. जिल्ह्यात 70% लोकांचे दोन्ही डोस पूर्ण हवेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या,गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  1. एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेनं
  2. स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु
  3. हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  4. सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु
  5. लग्नासाठी 200 जणांना परवानगी
  6. अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली
  7. सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी
  8. सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी
  9. पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
  10. ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार
  11. स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
  12. अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार
  13. वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार
  14. सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा  50 उपस्थितीत टक्के सुरु करण्याची परवानगी
  15. रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थितीत सुरू
  16. भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार
  17. लग्न समारंभ 25 टक्के लोकांच्या उपस्थितीत हॉल,
  18. खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती
  19. नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5

आजपासून नवी नियमावली लागू

राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत.आजपासून नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागू होईल.

इतर बातम्या:

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

Maharashtra Corona Restrictions removed by Uddhav Thackeray Government in 11 districts including Mumbai Pune Kolhapur Chandrapur and other

तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.