AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 926 नवे कोरोनाबाधित, 3 रुग्णांचा मृत्यू, धोका वाढतोय, केंद्राच्याही मोलाच्या सूचना

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर प्रशासनाची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रात 926 नवे कोरोनाबाधित, 3 रुग्णांचा मृत्यू, धोका वाढतोय, केंद्राच्याही मोलाच्या सूचना
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 8:33 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Maharashtra Corona Updates) पुन्हा प्रचंड वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. आरोग्य विभाग सर्तक झालं आहे. आगामी काळात कोरोनाचं संकट पुन्हा नव्याने उभं राहण्याची भीती आहे. कारण कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 926 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4 हजार 487 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. इथे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोना संक्रमण वाढण्याची भीती आहे. तसेच कोरोनामुळे आता इथे मृत्यू देखील होऊ लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या ही संपूर्ण देशात वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयदेखील सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. संबंधित सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात गेल्या 24 तासात 6 हजरा 50 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात सध्या कोरोनाचे 28 हजार 303 सक्रिय रुग्ण आहेत.

अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू

विशेष म्हणजे भारतात 203 दिवसांनंतर एका दिवसाला 6050 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याआधी गेल्यावर्षी 16 सप्टेंबरला 6 हजार 298 रुग्ण एकाच दिवशी आढळले होते. देशात आतापर्यंत 4 कोटी 47 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनामुळे काल महाराष्ट्रात तीन, कर्नाटकात आणि राजस्थानात दोन आणि दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांच्या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशात सध्याच्या घडीला रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.75 टक्के इतका आहे. तर कोरोना संक्रमाणाचा सध्याचा देशाताली दर हा 3.39 टक्के असल्याचं मानलं जात आहे. तर साप्ताहिक दर हा 3.02 टक्के इतका मानला जातोय. देशात आतापर्यंत 4 कोटी 41 लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशातील कोरोना मृत्यूर हा 1.19 टक्के इतका आहे.

देशात नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एक्सबीबी.1.16 हा व्हेरिएंट आढळत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचे आतापर्यंत जे नवे रुग्ण आढळले आहेत त्यांपैकी 38.2 टक्के रुग्णांमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. संबंधित विषाणू हा ओमायक्रोन स्वरुपाचा मानला जातोय.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.