Mumbai Local Train | लोकल प्रवासाच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्देश

| Updated on: Oct 26, 2021 | 7:13 PM

सध्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे निर्बंध बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकलने प्रवास (Local Train) करण्याबाबतच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय.

Mumbai Local Train | लोकल प्रवासाच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या राज्य सरकारचे नवे निर्देश
mumbai local and corona vaccination
Follow us on

मुंबई : सध्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे निर्बंध बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकलने प्रवास (Local Train) करण्याबाबतच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच लोकलने प्रवास करता येणार आहे. तसे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारचे नवे निर्देश कोणते आहेत ?

राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबाबत महत्त्वाचा नवा आदेश जारी केला आहे. नव्या आदेशानुसार यापुढे केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामान्य नागरिक या प्रत्येकाला लशीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. यापूर्वी शासकीय कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांना ओळखपत्राच्या आधारावरच तिकीट दिले जात होते.

यापूर्वी काय नियम होता ?

यापूर्व कोरोना रुग्णांची संख्या तसेच संसर्गाचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे राज्य सरकारने लोकल प्रवासावर बरेच निर्बंध आणले होते. या आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचऱ्यांना शासकीय व अत्यावश्यक ओळखपत्राच्या आधारावर लोकल पास आणि तिकीट वितरित केलं जात होतं. तसेच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास दिला जात होता.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार

दरम्यान, गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास आता जलद होणार आहे. कोरोनानंतर वाढलेल्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी, (ता.28) रोजी पासून चालविण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

मीडियात पब्लिसिटी स्टंट करू नका, पुरावे असतील तर कोर्टात जा; यास्मिन वानखेडेंचं नवाब मलिक यांना आव्हान

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, दोन दिवस पूर्ण पाणीकपात

(maharashtra government issued new rules for mumbai local train traveling two doses of corona vaccine mandatory)