AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता येण्याची भविष्यवाणी खरी होत नाही म्हणून भाजपची तारीख पे तारीख; नवाब मलिकांचा टोला

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (Maharashtra government stable and strong, says nawab malik)

सत्ता येण्याची भविष्यवाणी खरी होत नाही म्हणून भाजपची तारीख पे तारीख; नवाब मलिकांचा टोला
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 11:46 AM
Share

मुंबई: राज्यात सत्ता येणार ही भाजपची भविष्यवाणी खरी ठरत नाही. त्यामुळे भाजप नेत्यांना नैराश्य आलं असून पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये म्हणूनच ते तारीख पे तारीख देत आहेत, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. (Maharashtra government stable and strong, says nawab malik)

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार…सत्ता येणार… ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाहीये. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे.

आघाडीला धोका नाही

इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संभ्रम निर्माण करण्याचं काम

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. मात्र सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले होते फडणवीस?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचं सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचं लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला होता. (Maharashtra government stable and strong, says nawab malik)

संबंधित बातम्या:

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

‘ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात निवडणूका नको’, मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका

(Maharashtra government stable and strong, says nawab malik)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.