CJP Protest News Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? यावरून विलिनीकरण रखडल्याची माहिती – सूत्र
CJP Jantar Mantar Delhi News Live Updates in Marathi : सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. त्यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके धर्मेंद्र प्रधान यांच्या उपोषणावर ठाम आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? यावरून विलिनीकरण रखडल्याची माहिती – सूत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, यावरून विलिनीकरण रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची समजूत काढणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
Nashik Rain : पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
इगतपुरीच्या पांझरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून 369 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पांझरा मध्यम प्रकल्प रात्री 10 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून 369 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने पांझरा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना नदीपात्रात जाऊ नये, गुरेढोरे नदीपात्रात सोडू नयेत आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
-
-
Igatpuri dam : इगतपुरीमधील भाम धरण भरलं, मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली
इगतपुरीच्या भावली धरण पाठोपाठ भाम धरणही भरलं. भाम धरणाची निर्मिती मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी करण्यात आली आहे. भाम धरण भरल्याने मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता मागील वर्षी वर्षांपेक्षा 18 दिवस उशिराने भाम धरण भरले. आता धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय.
-
latur : लातूरमध्ये भाजप आमदार आणि खासदारांच्या सत्कार सभारंभाचा कार्यक्रम संपन्न
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं नवविर्वाचित भाजपा आमदार आणि खासदार यांच्या सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सभारंभाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-
Nashik rain : नाशिकमध्ये पावसाची संसतधार सुरूच; दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला
नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे नदी पात्रातील दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला आहे. तर पंचवटी आणि सराफ बाजार यांना जोडणारा राम सेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे. तर गोदा घाट परिसरातील छोटे-मोठे मंदिरात बुडाले आहेत. पावसामुले नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.
-
-
Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर रात्री देखील कायम असल्याचे पाहायला मिळालं. या पावसानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी अधिकाऱ्यांसह पूरस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
-
CJP Protest : सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण; PM मोदींचा विद्यार्थ्यांना खास संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ संदेश शेअर केला. पेपरफुटी हा साधारण विषय नाही. या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल. याबाबत कॅबिनेटमध्येही चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.
-
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी भेट घेऊन आणि पत्र देऊन उपोषण सोडावं, अशी विनंती केली होती. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. राज्यासहित देशातील सर्व अपडेट्स जाणून घ्या
Published On - Jul 24,2026 7:08 AM
