संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

तौक्ते चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये आले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका झाली आहे. अर्थात माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढू नका. पण ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत तेच कळत नाही. आता ते संपादकही नाहीत, असा चिमटा करतानाच ज्यांच्याकडे लक्ष जात नाहीत, ते लोक आपल्याकडे लक्ष वेधण्याचं काम करत असतात. राऊतही तेच करत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

रक्षा खडसे आमच्या खासदार

देवेंद्र फडणवीस हे आज जळगावात थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात मी गेलो होतो. त्यामुळे त्यांनी मला चहाला बोलवलं, म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यात वावगं असं काही समजू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पवार आजारी होते म्हणून भेटलो

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केलं. आपण खूप संकुचित होत आहोत. पवार आमचे विरोधक आहेत. पण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची तीन मोठी ऑपरेशन झाली आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली. हीच आपली प्रथा परंपरा आहे. मला कोविड झाला होता. तेव्हा पवारांनीही माझी फोनवरून विचारपूस केली होती, असं त्यांनी सांगितलं.

डॅमेज कंट्रोलची गरज नाही

आम्हाला सरकारला डॅमेज कंट्रोल करण्याची गरज नाही. पंढरपुरात आम्ही जिंकलो आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलची गरज सरकारला आहे. आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत, असंही ते म्हणाले.

सत्तांतराकडे लक्ष नाही

यावेळी त्यांनी राज्यातील सत्तांतरावरही भाष्य केलं. सध्या कोविडचा काळ आहे. आमचं सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचं लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असे संकेतही त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना भरीव मदत करा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना किती मदत करावी हे आम्ही सांगणार नाही. पण मुख्यमंत्री पूर्वी काही मागण्या करायचे. त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या लक्षात ठेवून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना शेत साफ करावं लागणार आहे. त्याचा खर्च मोठा आहे. त्याचीही मदत करावी. पीकं वाया गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे. एका गावाचं पुनर्वन अर्धवट झालं आहे, ते पूर्ण करावं, अशी मागणीही त्यांनी केली. (bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

संबंधित बातम्या:

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

‘ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात निवडणूका नको’, मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

(bjp leader devendra fadnavis slams sanjay raut)

Published On - 5:25 pm, Tue, 1 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI