AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | हालचाली वाढल्या, शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आठ आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणात महत्त्वाच्या हालचाली घडण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडत आहेत. तसेच निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु आहे.

BREAKING | हालचाली वाढल्या, शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 28, 2023 | 8:22 PM
Share

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील 8 आमदारांना विधीमंडळाने नोटीस पाठवली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये? अशी याचिका उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केलीय. याचबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील 8 आमदारांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विधीमंडळाकडून आत्तापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली आहे. पण शरद पवार गटातील आमदार अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना नोटीस आलेली नाही. माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंद केल्याने त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली नाही.

‘या’ आठ आमदारांना नोटीस

विधीमंडळाकडून अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आमदारांकडून रोखठोकपणे शरद पवार यांची बाजू मांडली जात आहे. त्यामुळे त्यांना विधिमंडळात प्रभावीपणे बाजू मांडता येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

राष्ट्रवादी कुणाची? याबाबत निर्णय कधी होणार?

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेना फुटीनंतर जशा घडामोडी घडल्या, अगदी तशाच घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. या लढाईत आता कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्यावर आधारुनच राज्यात आगामी काळात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...