प्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही: मुख्यमंत्री

सचिन पाटील

Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई: मी कोणत्याही प्रश्नापासून पळणारा मुख्यमंत्री नाही. मराठा आरक्षण असो वा अन्य कोणताही प्रश्न जनतेच्या सर्व प्रश्नांना सामोरं जाऊ. धनगर आरक्षणाची योग्यच शिफारस करु. मात्र ब्राह्मण समाजाला आर्थिक आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राचा कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण यासह विविध […]

प्रश्नांपासून पळणार नाही, ब्राह्मण आरक्षण शक्य नाही: मुख्यमंत्री

मुंबई: मी कोणत्याही प्रश्नापासून पळणारा मुख्यमंत्री नाही. मराठा आरक्षण असो वा अन्य कोणताही प्रश्न जनतेच्या सर्व प्रश्नांना सामोरं जाऊ. धनगर आरक्षणाची योग्यच शिफारस करु. मात्र ब्राह्मण समाजाला आर्थिक आरक्षण मिळणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्र महामंथन या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्राचा कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण यासह विविध क्षेत्रातील कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी धांडोळा घेतला. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. शिवाय केंद्रात आणि राज्यात पुन्हा आमचंच सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्राह्मण आरक्षण शक्य नाही

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “ब्राह्मण आरक्षणाची मागणी अल्पप्रमाणात होत आहे. ब्राह्मणांना आर्थिक आरक्षण शक्य नाही. तशी तरतूद संविधानात नाही. आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासांनाच मिळतं. ब्राह्मण समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आरक्षण मिळू शकत नाही. सध्या खुल्या प्रवर्गातील जागा अनेक आहेत, तिथे त्यांनी जागा मिळवाव्या. आर्थिक स्तर म्हणाल तर  आर्थिक दुर्बल घटकांसाठी या सरकारने सर्व घटकांसाठी तरतूद केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ब्राह्मणांना आर्थिक आरक्षण शक्य नाही. तशी तरतूद संविधानात नाही. आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासांनाच मिळतं. ब्राह्मण समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धनगर आरक्षण

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठीची शिफारस अंतिम टप्प्यात आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याची शिफारश केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधी विरोधात राहून प्रगल्भ होतील

राहुल गांधींनी अटलजींकडे पाहून विरोधक कसा असावा हे शिकावं. देशहिताच्या निर्णयांना स्वत:च्या फायद्यासाठी खोटेनाटे आरोप करु नयेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. राहुल गांधी विरोधात राहून आणखी प्रगल्भ होतील, असा टोला त्यांनी लगावला.

देशात काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहेच, लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक मजबूत हवेतच, राहुलजींना पुढील 5-10 वर्ष विरोधात राहायचं आहे, ते आणखी प्रगल्भ होतील, असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

युतीसाठी भाजप पुढाकार घेईल: मुख्यमंत्री

शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसाठी आम्ही पुढाकार घेऊ. राजकीय वास्तविकतेनुसार शिवसेना-भाजप एकत्र येतील, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार नाही. आम्ही दोघे एकत्र लढलो तर एकतर्फी विजय होईल, स्वतंत्र लढल्यास आव्हान उभं राहिल पण जिंकू नक्कीच, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मोठा की छोटा भाऊ हे तुम्ही ठरवा, पण शिवसेना आणि भाजप हे भाऊ आहेत हे नक्की, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मी माशीसुद्धा मारली नाही

प्रतिज्ञापत्रात काही गोष्टी लपवल्याचा आरोप होतोय, हे धादांत खोटं आहे. ज्याने आरोप केले त्याचं रेकॉर्ड तपासा. त्याने न्यायालयाचा अवमान केला आहे. मी माशीसुद्धा मारली नाही, पण माझ्याविरोधात 324 अंतर्गत गुन्हा दाखल झाला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

महाराष्ट्र महामंथन : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा दिसणार का?

 मुख्यमंत्री – ते जनता ठरवेल, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, केंद्रात आणि राज्यात आम्हीच परत येऊ, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय

महाराष्ट्र महामंथन : पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची लाट दिसली का?

मुख्यमंत्री – लाट वगैरे काही नाही. काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा फुगा लवकरच फुटेल. मध्य प्रदेशात आम्हाला मतं जास्त आहेत. जनता आमच्या पाठिशी

महाराष्ट्र महामंथन : रेकॉर्ड करुन ठेवा राज्यात आम्हाला आहे तेवढ्याच, किंबहुना जास्त जागा मिळतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे

शेती आणि उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर, उद्योगात अन्य राज्ये महाराष्ट्राच्या खूप मागे – मुख्यमंत्री

दिल्ली, गुजरातची एकत्र गुंतवणूक घेतली, तरी महाराष्ट्र त्यांच्या पुढे – मुख्यमंत्री

देशातील सर्वात जास्त स्टार्ट अप महाराष्ट्रात – मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक काम महाराष्ट्रात, केंद्र सरकारच्या मदतीने येत्या तीन वर्षात राज्य महामार्गांचं काम होईल – मुख्यमंत्री

कोस्टल रोड, एअरपोर्ट, मेट्रो प्रकल्प, अशी विविध कामं आम्ही युद्धपातळीने सुरु केली -मुख्यमंत्री

शिक्षणात 18 नंबरवरुन महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला आहे – मुख्यमंत्री

आरक्षण असो वा आदिवासी पट्ट्यांचा प्रश्न,  कोणत्याही प्रश्नावरुन पळ काढला नाही  – मुख्यमंत्री

महाराष्ट्र महामंथन : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र पुन्हा दिसणार का?

 मुख्यमंत्री – ते जनता ठरवेल, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, केंद्रात आणि राज्यात आम्हीच परत येऊ, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय

महाराष्ट्र महामंथन : पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची लाट दिसली का?

मुख्यमंत्री – लाट वगैरे काही नाही. काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा फुगा लवकरच फुटेल. मध्य प्रदेशात आम्हाला मतं जास्त आहेत. जनता आमच्या पाठिशी

महाराष्ट्र महामंथन : रेकॉर्ड करुन ठेवा राज्यात आम्हाला आहे तेवढ्याच, किंबहुना जास्त जागा मिळतील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : स्वामीनाथन आयोगाच्या सर्वाधिक शिफारसी मोदी सरकारने लागू केल्याचं खुद्द स्वामीनाथन यांनी सांगितलं –  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : स्वामीनाथन आयोगाच्या सर्वाधिक शिफारसी मोदी सरकारने लागू केल्याचं खुद्द स्वामीनाथन यांनी सांगितलं – : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : शेतकऱ्यांचं संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार जोमाने काम करतंय – : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्या त्या वेळेत होतील, दोन्ही निवडणुका एकत्र व्हाव्या हे खर्च, वेळ, कष्ट टाळण्याच्या दृष्टीने योग्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : राजकीय वास्तविकतेनुसार शिवसेना-भाजप एकत्र येतील, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : बाळासाहेब ठाकरेंबद्दल मोदींना प्रचंड आदर, मोदींनी पहिल्या भाषणात सांगितलं होतं मी कधीही बाळासाहेबांवर टीका करणार नाही  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : आम्ही दोघे एकत्र लढलो तर एकतर्फी विजय होईल, स्वतंत्र लढल्यास आव्हान उभं राहिल पण जिंकू नक्कीच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन : धनगर आरक्षणाबाबत योग्य ती शिफारस राज्य सरकारची असेल, ब्राह्मण समाजाला आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळू शकत नाही. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि सामाजिक स्तर चांगला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र महामंथन : प्रतिज्ञापत्रात काही गोष्टी लपवल्या हे धादांत खोटं आहे. ज्याने आरोप केले त्याचं रेकॉर्ड तपासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र महामंथन- मी माशीसुद्धा मारली नाही, पण माझ्याविरोधात 324 अंतर्गत गुन्हा दाखल झाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

महाराष्ट्र महामंथन-  देशात काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहेच, लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधक मजबूत हवेतच, राहुलजींना पुढील 5-10 वर्ष विरोधात राहायचं आहे, ते आणखी प्रगल्भ होतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #tv9महामंथन

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI