MLC Election Result 2026 : वारं कसं फिरलं? महायुती 3.2 वरून 2.3 वर कशी आली? 3 चुका भोवल्या

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित धक्का बसला आहे. 3.2 आघाडी असतानाही 2.3 असा निकाल लागल्याने महाविकास आघाडीने बाजी मारली. महायुतीने केलेल्या तीन मोठ्या चुकांमुळेच हा पराभव झाल्याचे समोर आले आहे. मित्रपक्षांना गृहीत धरणे, बंडखोरांची मनधरणी न करणे आणि अंतर्गत गटबाजी या प्रमुख कारणांमुळे महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्या.

MLC Election Result 2026 : वारं कसं फिरलं? महायुती 3.2 वरून 2.3 वर कशी आली? 3 चुका भोवल्या
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 2:52 PM

राज्यातील पाचही विधान परिषदेच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. या निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकेल अशी शक्यता होती. महायुतीचं ट्रॅक रेकॉर्ड पाहता तशी चर्चाही होती. पण दुपारी महायुतीने 3.2 आघाडी घेतल्यानंतर अचानक रात्री वारं फिरलं आणि 2.3 असा रिझल्ट आला. त्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. आता महायुतीत एकमेकांवर खापर फोडलं जात आहे. मात्र, तीन चुकांमुळे महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्याचं समोर आलं आहे.

पहिली चूक –

छत्रपती संभीजनगरची जागा राष्ट्रवादीच्या हातून गेली. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना तिकीट दिले होते. त्याला शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोध केला होता. मात्र, सत्तार यांची समजूत काढली गेली नाही. सत्तार यांनी थेट महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. सत्तार पाठिंबा देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांच्या स्टेजवर जाऊन त्यांचा उघड उघड प्रचार केला. त्यामुळे संभाजीनगरातील वारं फिरलं. अन् त्याचा फटका विद्यमान आमदार असणाऱ्या सतीश चव्हाणांना बसला. राष्ट्रवादीने सत्तार यांच्याशी चर्चा केली असती आणि त्यांची मनधरणी केली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Loading...

दुसरी चूक –

नागपूरमध्ये काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना तिकीट दिलं होतं. त्या ठिकाणी नितेश कराळे इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे शरद पवार गटाने नितेश कराळे यांना पक्षातून काढून टाकलं. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. नितेश कराळे काँग्रेसची मते खातील आणि आपला विजय होईल, असा भ्रम भाजपचा होता आणि तीच भाजपची मोठी चूक ठरली. नितेश कराळे यांनी बंडखोरी केली असली तरी दुसऱ्या पसंतीची मते अभिजीत वंजारी यांना देण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते वंजारी यांना गेली आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच वंजारी विजयी झाले. भाजपने कराळे यांच्याशी जुळवून घेतलं असतं तर कदाचित नागपूरमध्येही चित्र वेगळं दिसलं असतं. कराळे यांनी आपल्याकडे भाजपचं कोणी आलंच नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावरून कराळे यांनी भाजपला मदत केली असती हे स्पष्ट होतं.

तिसरी चूक –

भाजपने मित्र पक्षांना गृहित धरण्याचं काम केलं. आम्हीच सर्व जागा लढवू हा हेकेखोरपणा भाजपला नडला. पुण्याची एक जागा शिंदे गटाला हवी होती. भाजपने ती दिली नाही. त्यामुळे शिंदे गटाने अपक्ष उमेदवाराला बळ दिलं. त्यानंतरही भाजप गाफिल राहिली. आपण सहज निवडून येऊन असा विश्वास भाजपला होता. त्यामुळे त्यांनी पुण्यात शिंदे गटाची मनधरणी केली नाही. परिणामी जिंकून येऊ शकणारी सीट भाजपला गमवावी लागली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us