मुंबईत 35 वर्षीय महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया, 8 किलोचा मांसाचा गोळा काढला

| Updated on: Aug 11, 2021 | 7:49 AM

ठाणे परिसरात राहणाऱ्या महिलेला गेल्या तीन वर्षांपासून सतत पोटदुखीचा त्रास जाणवत होता, मात्र त्यांनी हे दुखणं अंगावर काढलं. परिणामी त्यांच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाला.

मुंबईत 35 वर्षीय महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया, 8 किलोचा मांसाचा गोळा काढला
Rajawadi Hospital
Follow us on

मुंबई : मुंबईत घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात 35 वर्षीय महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी 8 किलो वजनाचा मांसाचा गोळा काढला. आता ही महिला रुग्ण ठणठणीत बरी झाली असून पुढील काही दिवसात ती काम सुद्धा करू शकणार आहे.

ठाणे परिसरात राहणाऱ्या संबंधित महिलेला गेल्या तीन वर्षांपासून सतत पोटदुखीचा त्रास जाणवत होता, मात्र त्यांनी हे दुखणं अंगावर काढलं. परिणामी त्यांच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाला. यामुळे त्यांचे पोट गर्भवती महिलेसरखी दिसू लागले होते.

आर्थिक चणचणीमुळे शस्त्रक्रियेस नकार

राजावाडी रुग्णालयात त्या उपचारासाठी आल्या असता, डॉक्टरांनी त्यांची सर्व वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा त्यांना महिलेच्या पोटात मांसाचा गोळा आढळून आला. महिला घरकाम करते, तर तिचे पती हे ठाणे पालिकेत ठेका पद्धतीवर स्वच्छतेचं काम करतात. ऑपरेशन करण्यासाठी खूप पैसे लागतील, म्हणून त्यांनी डॉक्टरांना ऑपरेशन करण्यास नकार दिला होता.

साडेतीन तास ऑपरेशन

दरम्यान, डॉक्टर अजय गुजर यांनी हे ऑपरेशन राजावाडी रुग्णालयात मोफत होईल, असे सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला आणि ते शस्त्रक्रियेस तयार झाले. 5 ऑगस्ट रोजी डॉक्टर अजय गुजर आणि त्यांच्या चमूने साडेतीन तास ऑपरेशन करून 8 किलो वजनाचा मासाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला.

शरीरातील गाठींकडे लक्ष देण्याचे आवाहन

महिलेच्या चेहऱ्यावर आता हास्य दिसू लागले आहे. ज्या रुग्णांना अशाप्रकारे शरीरात कुठेही गाठ आढळली असेल, तर त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन डॉ अजय गुजर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

तो जन्माला आला पण पोटात गर्भ घेऊन, पिंपरीत 18 महिन्याच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया !

कोरोना काळात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, महिलेच्या गर्भाशयातून काढला 8 किलोचा मोठा गोळा