AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, महिलेच्या गर्भाशयातून काढला 8 किलोचा मोठा गोळा

वर्ध्याच्या सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. (Amravati 48-year-old woman 8 Kg Tumor removed surgically)

कोरोना काळात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, महिलेच्या गर्भाशयातून काढला 8 किलोचा मोठा गोळा
Surgery (फोटो प्रातनिधिक)
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 9:04 AM
Share

वर्धा : वर्ध्यातील ग्रामीण रुग्णालयात एका 48 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून तब्बल आठ किलो वजनाचा ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. वर्ध्याच्या सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे कोरोना काळातही त्या महिलेला दिलासा मिळाला आहे. (Amravati 48-year-old woman 8 Kg Tumor removed surgically from her uterus at a Wardha rural hospital)

कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ

अमरावतीत राहणारी एक 48 वर्षीय महिला रुग्ण गेल्या अनेक महिन्यांपासून पोटदुखीने त्रस्त होती. मात्र गेले काही महिने कोरोनाचा कहर सुरु होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्या महिलेच्या त्रासात भर पडली.

तीन तास शस्त्रक्रिया

मात्र काही महिन्यांपूर्वी तिला सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी तिच्या गर्भाशयात ट्यूमर असल्याची माहिती डॉक्टरांनी तिला दिली. तसेच यावर वेळीच शस्त्रक्रिया गरजेची असल्याचा सल्लाही दिला. यानंतर नुकतंच त्या महिलेवर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी तिच्या गर्भाशयातून 8 किलो वजनाचा मोठा मांसल गोळा यशस्वीरीत्या विलग करण्यात आला.

महिला पूर्णत: धोक्याबाहेर

दरम्यान कोरोना काळातही अशाप्रकारच्या अवघड शस्त्रक्रियेची जोखीम डॉक्टरांनी स्विकारल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून पूर्णतः धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी दिली.

(Amravati 48-year-old woman 8 Kg Tumor removed surgically from her uterus at a Wardha rural hospital)

संबंधित बातम्या : 

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक

मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? नागपूर पोलिसांची धावपळ

शेतीच्या वादावरून कुटुंबावर सशत्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.