Maharashtra News LIVE Update | हिंगोलीकरांना आनंदाची बातमी, जिल्हा कोरोनामुक्त

| Updated on: Sep 09, 2021 | 11:12 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी...

Maharashtra News LIVE Update | हिंगोलीकरांना आनंदाची बातमी, जिल्हा कोरोनामुक्त
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Sep 2021 08:41 PM (IST)

    हिंगोलीकरांना आनंदाची बातमी, जिल्हा कोरोनामुक्त

    हिंगोली :

    हिंगोलीकरांना आनंदाची बातमी, जिल्हा कोरोना मुक्त

    जिल्ह्यात आज एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही व उपचार घेत नाही

    जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 29 रुग्ण

    त्यापैकी 15 हजार 637रुग्णांना डिस्चार्ज

    आता पर्यँत 392 रुग्णांचा मृत्यू

    तर आज घडीला 00 रुग्णांवर उपचार सुरू

  • 09 Sep 2021 08:37 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 200 नवे कोरोनाबाधित, 123 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात २०० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १२३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. – २१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९७६१२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२२६. – एकूण मृत्यू -८९६५. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८६४२१. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८८६५

  • 09 Sep 2021 04:30 PM (IST)

    आम्ही गेल्या काही वर्षांपासून सांगत होतो, भुजबळ निर्दोष आहेत : जयंत पाटील

    कोल्हापूर :

    मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया :

    आम्ही गेल्या काही वर्षांपासून सांगत होतो, भुजबळ निर्दोष आहेत

    आपल्या लक्षात येईल, अशी अनेक निर्दोष प्रकरण असूनही महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर ईडी आणि सीबीआय आणत आहेत

    भुजबळांबाबतचा निर्णयाचे समाधान आहे

    ते या सगळ्या प्रकरणात धीराने उभे राहिले

    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर धाररिष्ट्याने जनतेची बाजू मांडली, तुरुंगात घालणाऱ्यांना सत्तेतून घालवले

    तुरुंगातून बाहेर आले की भूमिका बदलतात मात्र भुजबळ ठाम राहिले

    आरोप करणाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे, अनिल देशमुखावरील आरोपही असेच आहेत

  • 09 Sep 2021 04:08 PM (IST)

    काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले, म्हणाले...

    सोलापुर :

    काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांचे कान टोचले, म्हणाले...

    काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकात पाय घालणारे पदाधिकारी

    व्यासपीठावर बसलेले पदाधिकारी एकमेकात पाय घालणे बंद करावे

    जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी एकट्या धवलसिंह मोहिते-पाटील अजून सर्व पदाधिकाऱ्यांची

    मात्र व्यासपीठावर बसलेली पदाधिकारी एकमेकात पाय घालत बसतात

    पायांना कुठेतरी बांधून ठेवा तरच काँग्रेस पक्ष उभा राहील

    पदाधिकाऱ्यांची राजकारण होईल, वादामुळे थोडाफार समाधान होईल मात्र यामुळे पक्षाचे नुकसान होईल

    काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांचे टोचले कान

    धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी अंतर्गत गटबाजी करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सुनावले

  • 09 Sep 2021 01:57 PM (IST)

    शरद पवार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीत 7 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

    राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना परिस्थिती, १२ आमदारांचा मुद्दा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र, महाविकास आघाडीतील समन्वय, छगन भुजबळ यांना मिळालेली क्लिनचिट या मुद्यांवर चर्चा झाली. तसंच यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं २ कोटी ३६ लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्र्यांकडे दिला.

  • 09 Sep 2021 01:56 PM (IST)

    महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त, वकिलाची पहिली प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्या वकीलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    आम्ही महाराष्ट्र सदन प्रकरणी मुम्बई सेशन कोर्टात डिस्चार्ज अप्लिकेशन फाईल केला होता

    आज त्यावर न्यायालयाने निकाल देत छगन भुजबल , पंकज भुजबळ ,समीर भुजबळ आणि इतर 5 लोकांना डिस्चार्ज दिला आहे

    ह्या प्रकरणात काही ठोस पुरावे नव्हते , फाइनल आर्डरची कॉपी अजुन मिळाली नाही

    मात्र आम्ही न्यायल्याचे आभारी आहोत

    -वकील सुदर्शन खावसे यांची प्रतिक्रिया

  • 09 Sep 2021 01:22 PM (IST)

    सोलापुर -धवलशिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेस कमिटीत जंगी स्वागत

    सोलापुर -धवलशिंह मोहिते पाटील यांचा काँग्रेस कमिटीत जंगी स्वागत

    धवलशिंह मोहिते पाटील यांनी केला काँग्रेस जिल्ह्याध्यक्ष पदाचा कारभार

    काँग्रेस कार्यकर्त्यानी केला जंगी स्वागत

  • 09 Sep 2021 12:27 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शरद पवार वर्षावर दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शरद पवार वर्षावर दाखल

    ग्रीन एनर्जी संदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर शरद पवारांची भेट

    याचवेळी राज्यातील इतर विषयांवर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

  • 09 Sep 2021 11:18 AM (IST)

    तिसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं फक्त ॲानलाईन दर्शन होणार, वडेट्टीवारांची माहिती

    तिसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचं फक्त ॲानलाईन दर्शन होणार

    - गर्दी टाळता यावी म्हणून ॲानलाईन दर्शनाचा निर्णय

    - गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता

    - कोरोनामुळे आम्ही घेतलेला ॲानलाईन दर्शनाचा निर्णय योग्य

    - लोक नियम पाळत नाही, गर्दी वाढते

    - लोकांचा जीव महत्त्वाचा

    - लालगाबगचा राजासह राज्यातील सर्व सार्वजनिक मंडळात फक्त ॲानलाईन दर्शन

  • 09 Sep 2021 11:17 AM (IST)

    गणेश उत्सवाच्या निमित्ताने राज्याभरातल्या बाजारपेठा सजल्या

    गणेश उत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागात अनेक आकर्षक गणेश मूर्तीसह सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजली

    मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुक्ताईनगर तालुक्यात बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची कमी प्रमाणात गर्दी दिसत आहे

    यावर्षी ग्रामीण भागात बाजारपेठेत मंदीचे सावट

    जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा सावट असेल तरी मात्र या वेळेस गणेश उत्सवाच्या निमित्ताने अनेक आकर्षण जनक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे

  • 09 Sep 2021 10:48 AM (IST)

    धरणाच्या पाणलोटात क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी, मुळा धरण 80 टक्के भरले

    मुळा धरण 80 टक्के भरले...

    धरणाच्या पाणलोटात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात पाण्याची आवक ...

    मुळा धारणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांत मुळा धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

    26 टिएमसी क्षमतेचे हे धरण 80 टक्के भरले. या धरणातील पाणीसाठा 20800 दलघफूटावर पोहचला आहे.

  • 09 Sep 2021 10:47 AM (IST)

    सोलापुर -- धर्मवीर संभाजी महाराज तलावात हजारो मासे मृत्यूमुखी

    सोलापुर -- धर्मवीर संभाजी महाराज तलावात हजारो मासे मृत्यूमुखी

    मृत पावलेल्या माशांचा खच आला तलावाच्या काठाला

    तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे मासे  मेळ्याची माहिती

    मृत पावलेल्या माश्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी

  • 09 Sep 2021 10:46 AM (IST)

    प्रियकराशी वाद, विवाहितेची फॅनला गळफास घेऊन आत्महत्या

    देहूरोड परिसरात विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर फॅनला ओढणीच्या सह्हाने गळफास घेऊन केली आत्महत्या

    -ह्या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध आत्महेस प्रवृत्त केल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

    -प्रसाद गायकवाड,रितेश भालेराव या दोघांना देहूरोड पोलिसांनी केली अटक तर ह्या आरोपींमध्ये एका महिलेलाही समावेश आहे

    -26 वर्षीय महिला आणि आरोपी प्रसाद गायकवाड यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते त्यामध्ये अनेकदा प्रियकर प्रसाद आणि मयत महिला याच्या मध्ये वाद होते त्यात आरोपी प्रसाद गायकवाड हा तिला शिवीगाळ करत मारहाण देखील करत होत त्यामुळे राहत्या घरात बेडरूम मधील छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय

  • 09 Sep 2021 10:06 AM (IST)

    खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारणार, आ. रोहित पवारांची संकल्पना

    खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात उभारणार देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज, आमदार रोहित पवार यांची नवी संकल्पना

    दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना

    तर आज पासून देशातील विविध भागात भगव्या ध्वजाची ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा.

    74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार

    या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे

    74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार

    6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास

    लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’

    निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झालेल्या खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात उभारणार भगवा ध्वज

  • 09 Sep 2021 10:06 AM (IST)

    नाशिकमध्ये गर्दी हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच गर्दी जमवली

    नाशिक - गर्दी हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच जमवली गर्दी

    मॉक ड्रिलच्या नावाखाली नाशिकरोड परिसरात मोठी गर्दी

    गर्दीतील तरुणांच्या चेहऱ्यावर मास्क ही नाही, सोशल डिस्ट्सनिंगचे पालन नाही

    कायद्याच्या रक्षकांनीच सरकारी निरबद्ध पायदळी तुडविले

    मॉक ड्रिलच्या  उत्साहात  आपणच सरकारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे भान ही पोलिसांना राहिले नाही.

    आंदोलनकर्तेना पोलीस  हटकतात,  आंदोलक, पोलिसांच्या दिशेन दगडफेक करतात पोलीस लाठीमार करून आंदोलक पळवून लावतात असे पोलीसांनी केले प्रात्यक्षिक

    मॉक ड्रिल साठीपोलिसांनी रस्त्यावर जमवेलेली गर्दी,  सरकारी नियमाचा पोलिसांना  पडलेला सरकारी नियमाचा  विसर शहरात चर्चेचा विषय

  • 09 Sep 2021 10:05 AM (IST)

    मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका, दोन दिवसात तब्बल 31 जणांचा बळी

    मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका

    दोन दिवसात गेला तब्बल 31 जणांचा बळी

    तर पाच जण अद्यापही बेपत्ता

    एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 4 जणांचा झाला मृत्यू

    तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू

    तर 120 ते 150 पाळीव प्राण्यांचा झाला मृत्यू

    तर तीन लाख हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

  • 09 Sep 2021 09:30 AM (IST)

    पुण्यात गणेश उत्सवाच्या तयारीची लगबग, मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच गर्दी

    गणेश उत्सवाच्या तयारीची लगबग पुण्यात पाहायला मिळते.

    खरेदीसाठी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत.

    पुण्यातील मंडई परिसरामध्ये सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतीये.

  • 09 Sep 2021 09:29 AM (IST)

    यवतमाळ शहरातील राजन्ना अपार्टमेंट मध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्यावर

    यवतमाळ- यवतमाळ शहरातील राजन्ना अपार्टमेंट मध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड 13 जुगाऱ्यासह 5 लाखाची रोकड केली जप्त, शहरातील प्रतिष्ठित लोक खेळत होते जुगार

  • 09 Sep 2021 09:29 AM (IST)

    नाशिक - रामसेतू पूल परिसरात एकाची हत्या

    नाशिक - रामसेतू पूल परिसरात एकाची हत्या

    डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड

    हॉटेल मध्ये आचारी म्हणून काम करत होता सदर इसम

    एका संशयितास पोलिसांनी घेतलं ताब्यात

    आपसातील पूर्ववैमन्सयातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

    पोलीस तपास सुरू

  • 09 Sep 2021 08:42 AM (IST)

    ठाकरे मोदींची पहिली सहमती, बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाचा ठराव मंजूर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाचा ठराव शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतीलच्या महासभेत अवघ्या काही सेकंदात कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला

  • 09 Sep 2021 07:59 AM (IST)

    मुंबई ठाण्यात आज पावसाचा अंदाज नाही, राज्यात 5 जिल्ह्यांत आज पावसाचा अंदाज

  • 09 Sep 2021 07:57 AM (IST)

    एका दिवसांत नागपुरकरांनी फस्त केलं अडीच कोटींचं मटण

    -एका दिवसांत नागपुरकरांनी फस्त केलं अडीच कोटींचं मटण

    - नागपूरकरांनी पाडव्याला तब्बल अडीच कोटी रुपयांचे मटण फस्त केल्याचा अंदाज

    - शहरात एका दिवसांत जवळपास अकरा हजार बोकडांची विक्री झाली

    - संपूर्ण महिनाभर श्रावणामुळे मांसाहार करू न शकलेल्यांनी एका दिवसांत फस्त केलं अडीच कोटींचं मटण

  • 09 Sep 2021 07:54 AM (IST)

    T20 World Cup : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा

  • 09 Sep 2021 07:51 AM (IST)

    नागपुरातील सार्वजनिक जमीन विकणे महानगरपालिका, NIT ला महागात पडणार

    नागपुरातील सार्वजनिक जमीन विकणे महानगरपालिका, NIT महागात पडणार

    - मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ओढले ताशेरे

    - महानगरपालिका, NIT चे अधिकारी बेकायदेशीरपणे वागत असल्याचं न्यायालयाचं मत

    - महानगरपालिका, NIT ने शहरातील अनेक जमिनी दिल्या लीजवर

    - महानगरपालिका, NIT च्या काही अधिकाऱ्यांना भोवणार प्रकरण

  • 09 Sep 2021 07:50 AM (IST)

    6 ते 7 लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल

    रत्नागिरी- गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल सहा ते सात लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वे एसटी आणि खासगी गाड्यांच्या माध्यमातून चाकमरान्यांची गर्दी गणेशोत्सवासाठी सोडलेल्या रेल्वे देखिल चाकरमान्यांनी भरलेल्या रत्नागिरी पासून सांवतवाडी पर्यत रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची गर्दी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्लॅन तयार, गणेशोत्सवासाठी सामानासकट चाकरमानी गावाकडे

  • 09 Sep 2021 07:49 AM (IST)

    पावसाने बुलडाण्यात 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवाल सादर

    पावसामुळे मोताळा तालुक्यातील 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान,

    कृषी विभागाच्या प्राथमिक अहवाल, पिकांचे सर्वेक्षण प्रगती पथावर सुरू,

    दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने नदी नाल्याना आला पूर,

    त्यामुळे नदीकाठचा पिकांचे फार मोठं नुकसान झालेय, अनेकांची पिकेही गेली वाहून,

    सोयाबीन, कपाशी सह इतर पिकांचे नुकसान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज

  • 09 Sep 2021 07:48 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्याचं निधन, पक्षावर शोककळा

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष 34 वर्षीय राणा चंदन यांचं निधन,

    औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना किडनी च्या आजाराने झाले निधन,

    स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते राणा चंदन,

    रवीकांत तुपकर यांचा तसेच उजवा हात म्हणून राणा चंदन यांची ओळख तर आंदोलन सम्राट म्हणून राणा यांची ओळख होती

    शेतकरी चळवळीसाठी अगदी कमी वयापासून संघर्ष

  • 09 Sep 2021 07:46 AM (IST)

    कोरोना लस न घेतलेल्या शिक्षकांचे पगार थांबणार?

    सोलापुर -- अद्याप एकही कोरोना प्रतिबंधक लस नाही घेतलेल्या शिक्षकांचा थांबू शकतो पगार

    जिल्ह्यातील जिल्हा परिषद ,महापालिका  खाजगी प्राथमिक शाळेचे 22 हजार शिक्षक

    पैकी 14000 शिक्षकांनी दुसरा डोस तर 5 हजार शिक्षकांनी घेतला पहिला डोस

    अद्याप 2 हजार 240 शिक्षकांनी एकही डोस घेतले नाही

    शिक्षण विभागाने केली माहिती संकलित

    डोस न  घेतलेल्या  शिक्षकांना कारणे दाखवावे लागतील अन्यथा शिक्षकांचा पगार थांबविण्याचा शिक्षण विभागाचा इशारा

  • 09 Sep 2021 07:46 AM (IST)

    सिन्नर भूषण त्र्यंबक बाबा भगत यांचे निधन

    नाशिक - सिन्नर भूषण त्रंबक बाबा भगत यांचे निधन

    त्रंबक बाबा भगत हे सिन्नरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे सेवेकरी

    देशभरात त्रंबक बाबांचे हजारो भक्त

    जन्मदिनीचं झालेल्या त्रंबक बाबांच्या निधनाने भक्तांमध्ये हळहळ

    वयाच्या 89 व्या वर्षी आजारपणामुळे झालं निधन

  • 09 Sep 2021 07:42 AM (IST)

    सोमय्यांची पुण्यात पत्रकार परिषद, राजकीय नेत्यांच्या पुण्यातील अवैध बांधकामांबाबत माहिती उघड करणार

    भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर

    सोमय्या करणार राजकीय नेत्यांच्या पुण्यातील अवैध बांधकामांबाबत माहिती उघड

    दुपारी तीन वाजता घेणार पत्रकार परिषद

    त्यानंतर अजित पवारांचा अंमल असलेल्या पीडिसीसी बँकेलाही देणार भेट

    पुण्यातले तसेच राज्यातले कोणते नेते सोमय्यांच्या रडावर आहेत याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू

Published On - Sep 09,2021 7:40 AM

Follow us
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.