Mumbai School Reopening: मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, बीएमसीचा मोठा निर्णय

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं (BMC) कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai School Reopening: मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, बीएमसीचा मोठा निर्णय
school reopening
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 12:38 PM

मुंबई:  मुंबई महापालिकेनं (BMC) कार्यक्षेत्रातील शाळा 15 डिसेंबरपासून (Mumbai School Reopen) सुरु करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra School Reopen) येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार नाहीत. मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. पालिकेचे शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी यासंदर्भात माहिती दिली होती.

शासन निर्णय जारी

गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.  मात्र, मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्यासाठी 15 डिसेंबरही तारिख निश्चित केली आहे.

पुण्यात शाळा सुरु करण्यावरुन संभ्रम

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र आहे. पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरु करावी अशी पालकांची भूमिका आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

Pune School Reopening : पुण्यात शाळांची घंटा वाजणार का? विद्येच्या माहेरघरात संभ्रमाचं वातावरण

Solapur School Reopening: सोलापूर शहरातील शाळा सुरु की बंद, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.