Solapur School Reopening: सोलापूर शहरातील शाळा सुरु की बंद, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष

सोलापूर जिल्ह्यातील शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. तर, सोलापूर शहरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय आज होणार आहे.

Solapur School Reopening: सोलापूर शहरातील शाळा सुरु की बंद, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 10:49 AM

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्ग (Corona Virus) मार्च 2020 मध्ये सुरु झाल्यापासून राज्यातील प्राथमिक शाळा बंद होत्या. राज्य सरकारनं टप्प्याटप्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग 1 डिसेंबरपासून (Maharashtra School Reopen) सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. तर, सोलापूर शहरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय आज होणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर या संदर्भातील निर्णय घेणार आहेत.

1 डिसेंबरपासून वर्ग सुरु, विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास शाळा बंद, एका वर्गात 20 विद्यार्थी, नवी नियमावली जारी

सोलापूर शहरात शाळा सुरु होणार का?

राज्य सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. ओमिक्रॉन या नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महापालिकेनं देखील पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट, ओमिक्रॉनचं संकट असल्यानं सोलापूर शहरातील शाळा सुरु करण्याबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आज निर्णय घेणार आहेत.

Maharashtra School Reopening | राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी

मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

सोलापूर शहरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. या बैठकीत सोलापूर शहरातील शाळा सुरू होणार की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यच्या शिक्षण विभागानं घेतलाय मात्र दुसरीकडे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा असल्यानं सोलापूर महापालिका सावधपणे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या 757 शाळा असून सोलापूर शहरात त्यापैकी 368 प्राथमिक शाळा आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या शाळा सुरु होणार की नाही यांसंदर्भातील कोणता निर्णय होतो ते पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

CBSE Term 1 exam : सीबीएसई दहावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून, नेमकं स्वरुप काय?

Maharashtra : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

Solapur Municipal Corporation school reopening decision will take today by commissioner P Shivshankar

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.