CBSE Term 1 exam : सीबीएसई दहावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून, नेमकं स्वरुप काय?

सीबीएसईनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा सुरु होत आहेत.

CBSE Term 1 exam : सीबीएसई दहावीच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून, नेमकं स्वरुप काय?
CBSE
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 9:53 AM

CBSE Term 1 exam नवी दिल्ली : सीबीएसईनं नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीत घेण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्र परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार आजपासून इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा सुरु होत आहेत. तर इयत्ता बारावीच्या पहिल्या टर्मची परीक्षा 1 डिसेंबर पासून सुरु होईल. परीक्षेचं प्रवेशपत्र www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परीक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

ऑफलाईन परीक्षा

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 2021 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. बोर्डाने टर्म -1 परीक्षा 50 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेचं आयोजन केलं आहे.

प्रश्न कसे असणार?

सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.

या विषयांची होणार परीक्षा

सामाजिक शास्त्र, विज्ञान, गृह विज्ञान, स्टँडर्ड गणित, बेसिक गणित, कॉम्प्युटर अ‌ॅप्लिकेशन्स, हिंदी कोर्स अ, हिंदी कोर्स ब, इंग्रजी या विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 11 डिसेंबरला दहावीच्या परीक्षेचा अंतिम पेपर असेल.

इतर बातम्या:

CBSE Datesheet of 10th-12th Term-1 exam: सीबीएसई दहावी बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्राची डेटशीट जारी, 30 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरु

CBSE Date Sheet 2021 : सीबीएसई दहावी बारावीच्या पहिल्या सत्राची डेटशीट जाहीर करणार, प्रश्नांचं स्वरुप कसं असणार

CBSE term 1 exam class 10 for Major subject start from today check details here

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.