राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

राष्ट्रवादी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या बड्या नेत्याने अचानक सर्व पदांचे राजीनामा दिल्याने हडकंप माजला आहे.या नेत्याने समाजमाध्यमात पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
ncp flag
| Updated on: May 14, 2026 | 5:01 PM

राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते आनंद परांजपे यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. आनंद परांजपे हे गेले अनेक दिवस नाराज होते असे म्हटले जात आहे. त्यांनी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषद न मिळाल्याने ते नाराज होते असे म्हटले जात आहे.

येथे पोस्ट पाहा –

आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर एक पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!

एकनाथ शिंदे यांची घेतली होती भेट

शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंद परांजपे यांनी अलिकडेच भेट घेतली होती. ते अनेक दिवसांपासून पक्षात नाराज होते. त्यांनी विधानसभा, महानगर पालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूकांदरम्यान पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी निष्ठेने पार पाडली होती. त्यांना विधान परिषदेवर संधी हवी होती असे म्हटले जाते आहे.

राष्ट्रवादी पक्षात बडे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांना बाजूला ठेवत पक्षाच्या नेता सुनेत्रा पवार यांनी पक्षातील आर्थिक अधिकार आपल्या कुटुंबात ठेवले असल्याने आधीच अस्वस्थता आहे. त्यातच ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी अचानक राजीनाम दिल्याने पक्षाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us