AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: तिसर्‍या अर्जावर निर्णय रखडला, आझाद मैदानावरील आंदोलनासाठी जरांगे हायकोर्टात? त्या विशेष बैठकीत घडलं काय?

Manoj Jarange Mumbai Maratha agitation High Court: आझाद मैदानावर आंदोलन आणि उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे यांनी केलेले दोन अर्ज पोलिसांनी फेटाळले. तर तिसऱ्या अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. जरांगे पाटील हायकोर्टात धाव घेतला जाणार का?

Manoj Jarange: तिसर्‍या अर्जावर निर्णय रखडला, आझाद मैदानावरील आंदोलनासाठी जरांगे हायकोर्टात? त्या विशेष बैठकीत घडलं काय?
मनोज जरांगे पाटील, मुंबई आंदोलन, हायकोर्टImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 16, 2026 | 11:05 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पटोद्यात मुक्कामी आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. ते थोड्याच वेळात ते मुंबईसाठी कूच करणार आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडे दोनदा अर्ज केले. दोन्ही अर्ज सण-उत्सवाचे कारण देत फेटाळण्यात आले. जरांगे यांच्या तिसर्‍या अर्जावर पोलिसांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. आंदोलन निर्णयाक टप्प्यावर पोहचलेले असताना परवानगी न मिळाल्याने जरांगे पाटील हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील हायकोर्टात दाद मागणार

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदान मराठा नेते जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा मागितलेल्या परवानगीवर अद्याप निर्णय झालेला नाही. आंदोलनाचा परवानगी मिळावी यासाठी जरांगे पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पूर्वी जरांगे पाटील यांच्याकडून दोन वेळा परवानगी मागण्यात आली होती. मात्र मागच्या आंदोलनाचे दाखले देत दोन्ही वेळा पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. त्या सुनावणीकडे सरकार आणि पोलिसांचे लक्ष लागले आहे.

पोलीस आयुक्तांच्या विशेष बैठकीत काय घडलं?

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी काल एक विशेष बैठकही घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकित आंदोलना दरम्यान लागणारा पोलिस बंदोबस्त, अतिरिक्त लागणारा पोलिस बंदोबस्त, इतर साहित्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई उच्च न्यायालयात परवानगीसाठी जरांगे पाटील गेल्यास न्यायालयाने पोलिसांकडे विचारणा केल्यास मागील आंदोलना दरम्यान झालेल्या घडामोडींची चर्चा झाली. तसेच नियम अटींचे होणारे उल्लंघन आणि सणाच्या काळात आंदोलनाचा परवानगी दिल्यास होणार्‍या परिणामांबाबत पोलिसांकडूनही मत मांडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टर दाखल

जरांगे पाटलांच्या तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके दाखल झाले आहेत. प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घ्यावेत अशी आमची विनंती आहे. त्यांना उपचार देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर सतीशकुमार सोळंके यांनी माहिती दिली. वैद्यकीय पथक ठाण मांडून आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जरांगे पाटलांसोबत चर्चेचा प्रयत्न करत आहेत. तर काही झालं तरी आम्ही मुंबईला जाणारच असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही मराठा बांधवांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे मराठा आंदोलकांनी सांगितले.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था