AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने मानसीसोबत गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे (Manasi Naik complaint against molesters).

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
| Updated on: Feb 08, 2020 | 3:25 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मानसी नाईकने आपल्यासोबत छेडछाड झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात ही छेडछाड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मानसीने मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (Manasi Naik complaint against molesters)

अभिनेत्री मानसी नाईक 5 फेब्रुवारीला पुण्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं. त्याने मंचाजवळ जाऊन मानसीला धमकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मानसीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मानसीने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याशिवाय याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली (Mansi Naik complaint against molesters).

सिनेअभिनेत्रींचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना याअगोरही समोर आल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत देखील अशाप्रकारची घटना घडली होती. प्रिया बेर्डे काही महिन्यांपूर्वी एका मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेल्या असताना दारु प्यायलेला माणूस त्यांच्याकडे बघत होता. त्यानंतर तो थेट प्रिया यांच्या बाजूला येऊन बसला आणि अश्लिल चाळे करु लागला. त्यामुळे प्रिया बेर्डे यांनी तिथेच त्या टवाळखोराला श्रीमुखात लगावली होती.

मुंबईतील व्यावसायिक विकास सचदेवा याने 2017 साली एका अभिनेत्रीचा विमानात विनयभंग केला होता. त्यामुळे 15 जानेवारी 2020 रोजी मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवत सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपींना शिक्षा होऊनही अशाप्रकारच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.