वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, बीएमसीने कारवाईचा बडगा उगारताच बंद नर्सिंग होम सुरु

| Updated on: Apr 27, 2020 | 4:13 PM

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 हजार 416 खासगी 'नर्सिंग होम' पैकी 1 हजार 68 (75.42 टक्के) एवढे खासगी नर्सिंग होम सुरु झाले आहेत (Nursing home open after warning of BMC).

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, बीएमसीने कारवाईचा बडगा उगारताच बंद नर्सिंग होम सुरु
Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांची सेवा अनेक ठिकाणी बंद असल्याने ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात बंद खासगी ‘नर्सिंग होम’वर (शुश्रुषा गृह, Polyclinic इत्यादी) कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 हजार 416 खासगी ‘नर्सिंग होम’ पैकी 1 हजार 68 (75.42 टक्के) एवढे खासगी नर्सिंग होम सुरु झाले आहेत (Nursing home open after warning of BMC). तसेच महापालिका क्षेत्रातील 99 डायलिसिस सेंटर पैकी 89 सेंटर सुरु झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. आज याबाबत घेण्यात आलेल्या आढाव्यात ही माहिती समोर आली.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे 75 टक्के खासगी ‘नर्सिंग होम’ चालू झाले असले, तरी उर्वरित सुमारे 25 टक्के नर्सिंग होम अजूनही बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊन देखील हे ‘नर्सिंग होम’ आपली सेवा सुरु करत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या खासगी ‘नर्सिंग होम’वर कारवाई करण्याची प्रशासनाची इच्छा नसल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेने नमूद केलं आहे. मात्र, वारंवार केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आणि त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने संबंधित ‘नर्सिंग होम’चे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईबाबत सर्व संबंधितांना नोटीस द्याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आज सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक खासगी दवाखाने (Dispensary) देखील बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर खासगी दवाखान्यांवर देखील ‘एपिडेमिक ॲक्ट 1897’ (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला यापूर्वीच दिले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

राज्यात पुढील चार दिवसात विजांच्या कडकडाटासह गारांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, कुठे किती नवे रुग्ण?

नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, कोकणातील वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन आणि केशार्पणही

Nursing home open after warning of BMC