कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान

कोरोना विरुद्धच्या संघर्षातही डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला (Police Doctor Donate Plasma For Covid Patient) आहे.

कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान
Namrata Patil

|

Jul 12, 2020 | 10:00 PM

मुंबई : देशात कोरोनाच्या विरोधात सुरु झालेला लढा अद्याप संपलेला (Police Doctor Donate Plasma For Covid Patient) नाही. या संघर्षात पोलीस आणि डॉक्टर हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पोलीस रस्त्यावर कायदा सुव्यवस्था पाळत आहे. तर डॉक्टर रुग्णालयात लोकांचे जीव वाचवत आहे. या संघर्षातही डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला आहे. त्यामुळे डॉक्टर-पोलीस पीडितांचे जीव वाचवण्यास मदत करत आहे.

मुंबई पोलिसांचा अजून एक स्तुत्य उपक्रम समोर आला आहे. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमधील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्लाझ्मा दान केला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांमध्ये मदत होईल. खार पोलीस ठाण्यातील चार अधिकारी आणि 14 कर्मचारी अशा एकूण 18 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद खार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. तर उर्वरित कर्मचारीही प्लाझ्मा दान करणार आहे. तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचा आवाहन खारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काबुद्ले यांनी (Police Doctor Donate Plasma For Covid Patient) केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पोलिसासोबत अनेक डॉक्टरांनी सुद्धा आपला प्लाझ्मा दान करुन कोरोनाग्रस्तांची मदत केली आहे. मुंबईच्या भाटिया रुग्णालयातही दहा डॉक्टरांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनीही आपला प्लाझ्मा दान करत कोरोनाबाधितांना मदत केली आहे.

कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे. शासन स्तरावर पूर्ण मशीनरी कोरोनाला लढा देण्यासाठी सज्ज आहे. आपण सर्वांनी मिळून जर कोरोनाला लढा दिला तर नक्की महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. तसेच डॉक्टर, पोलीस आपलं कर्तव्य निभावल्यानंतर प्लाझ्मा दान करत कोरोनाच्या विरोधात संघर्ष करत आहे. तसेच समाजात जे व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन केले जात (Police Doctor Donate Plasma For Covid Patient) आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण

“माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा…” मंत्री उदय सामंतांचं गाऱ्हाणं

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें