"माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा..." मंत्री उदय सामंतांचं गाऱ्हाणं

परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा... असे साकडं गाऱ्हाण्यातून उदय सामंत यांनी घातलं (Minister Uday Samant Pray God For Corona Free) आहे.

"माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा..." मंत्री उदय सामंतांचं गाऱ्हाणं

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परमेश्वराला साकडं घातलं आहे. (Minister Uday Samant Pray God For Corona Free)

कोकणात पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या गाऱ्हाणाच्या माध्यमातून उदय सामंतानी देवाला साकडं घातलं आहे. “भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर कोरोना मुक्त कर महाराजा….व्हय महाराजा….,” अशा पद्धतीचे गाऱ्हणं लिहित त्यांनी ट्विटवर पोस्ट केलं आहे.

तसेच राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्नही त्यांनी या गाऱ्हाण्याच्या माध्यमातून उपस्थितीत केला आहे. “माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा…” असे साकडं गाऱ्हाण्यातून उदय सामंत यांनी घातलं आहे.

उदय सामंत यांचे ट्विट 

बा देवा महाराजा….

व्हय महाराजा….

ह्यो जो काय कोरोनाचो राक्षस जगात, देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो काय तो बंदोबस्त कर रे महाराजा….

पॉझिटिव्ह इले त्येंका निगेटिव्ह कर, निगेटिव्ह इले त्येंका सुखरुप ठेव रे महाराजा…

माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा….

चाकरमान्यांका गणपतीचा दर्शन होऊ दि रे महाराजा…

ह्येच्यात जर कोणी आडो इलो तर त्येका उभो कर, उभो इलो तर त्येका आडो कर रे महाराजा….

एकाचे एकवीस कर….पाचाचे पंचवीस कर… पण माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर कोरोना मुक्त कर महाराजा….

व्हय महाराजा….

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???,” असा प्रश्नही उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. (Minister Uday Samant Pray God For Corona Free)

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी “राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो आहे. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या” अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. (Minister Uday Samant Pray God For Corona Free)

संबंधित बातम्या : 

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *