मोठी बातमी ! अनिल देशमुखांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटलांविरोधात तक्रार, नेमका आरोप काय?

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील या सध्या अडचणीत आल्या आहेत. (virendra pawar jayashree patil complaint)

मोठी बातमी ! अनिल देशमुखांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटलांविरोधात तक्रार, नेमका आरोप काय?
Jaishri-Patil
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 11:07 PM

मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील या सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे नेते विरेंद्र पवार (Virendra Pawar) यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीच्या टार्गेटचे आरोप झाल्यानंतर जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी याचिका दाखल करत या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर देशमुखांना राजीमाना द्यावा लागला होता. (Maratha Kranti Morcha leader Virendra Pawar file complaint against Jayashree Patil)

तक्रारीत नेमंक काय ?

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर जयश्री पाटील चांगल्याच चर्चेत आल्या. मात्र, सध्या त्यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरेंद्र पवार यांनी ही तक्रार दाखली केली असून त्यांनी जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी बोलत असताना जयश्री पाटील या नेहमीच मराठा समाजाचा उल्लेख करतात. तसेच मुद्दामहून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप तक्रारदार विरेंद्र पवार यांनी केला आहे. तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल तसेच अटक करण्याची मागणीसुद्धा पवार यांनी केली आहे.

माफी मागितली नाही तर मराठा समाज आक्रमक होणार

विरेंद्र पवार यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले. त्यांनी जयश्री पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पाटील यांनी माफी माफी मागितली नाही, तर आगामी काळात मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारासुद्दा पवार यांनी यावेळी दिला.

कोण आहेत जयश्री पाटील? (Who is Adv Jayashree Patil)

>>> अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली

>>>  जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे

>>> ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत .

>>> जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं

>>> त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे नेते विरेंद्र पवार यांनी जयश्री पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आगामी काळात पवार यांनी केलेल्या आरोपांना जयश्री पाटील कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

Param Bir Singh Anil Deshmukh Live Updates | परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?

(Maratha Kranti Morcha leader Virendra Pawar file complaint against Jayashree Patil)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.