AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखाचा फोन, ठेकेदार कुठून आले? बारस्कारांच्या आरोपाने राज्यात खळबळ

अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंना डिफेंडर कार कोणी दिली? त्यांच्या मुलाकडे २ लाखाचा मोबाईल कुठून आला? उपोषण सोडताना कंत्राटदार कसे उपस्थित होते? कंत्राटदारांना ७५० कोटींची कामे कशी मिळाली? अशा प्रश्नांची सरबत्ती करत बारस्कर यांनी जरांगेंना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखाचा फोन, ठेकेदार कुठून आले? बारस्कारांच्या आरोपाने राज्यात खळबळ
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 1:02 PM
Share

मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? जरांगेंच्या मुलाकडे दोन लाखाचा मोबाईल कुठून आला? जरांगे उपोषण सोडत असताना तिथे ठेकेदार कसे आले? या ठेकेदारांचा विखे पाटलांशी संबंध काय? अशा प्रश्नांची सरबत्तीच अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजय महाराज बारस्कर हे आरोप करत असताना मनोज जरांगे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे अधिकच गूढ वाढलं आहे.

अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांची पोलखोल केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना डिफेंडर कार देण्यात आली. ही कार देणारा सांगलीचा भोसले कोण आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाची लायकी नसताना त्याच्याकडे 2 लाखांचा मोबाईल फोन कुठून आला? जरांगेंच्या मुलाला पैसे कोण देतं? असे सवाल करतानाच जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी. मी चर्चेला करायला तयार आहे. तुमच्यात हिंमत आहे ना? मग याच चर्चा करायला. तुमची बुद्धी किती आहे हे दिसून येईल, असं आव्हानच अजय महाराज बारस्कर यांनी दिलं आहे.

त्यांनाच कंत्राटं कसे मिळतात?

जरांगे पाटील यांच्या संदर्भात एक खळबळजनक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे ट्विट वैभव कोकाटे यांनी केलं आहे. जरांगेंनी उपोषण सोडलं त्याठिकाणी किशोर बलांडे हा ठेकेदार काय करत होता? या बलांडेच्या माणिक इन्फ्रा कंपनीला मागच्या काही वर्षात 750 कोटी रुपयांचं कंत्राट कसं काय मिळालं? जे आंदोलनात मध्यस्थी करतात त्यांच्या कंपन्यांनाच कंत्राट कसे मिळतात? याची उत्तरे जरांगे पाटील यांनी द्यावीत, असं आव्हानही बारस्कर यांनी केलं आहे.

कंत्राटदारच का लागतात?

किशोर बलांडे यांना ईडीची नोटीस आली असेल. त्यामुळे ही नोटीस थांबवण्यासाठी तुम्ही आता आंदोलन मागे घेतल का? अनेक मराठा आंदोलकांनी आपला जीव मराठा आरक्षणासाठी गमावला. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडत असताना या तरुणांच्या घरातील एकही व्यक्ती का नव्हती? उपोषण सोडतेवेळी जरांगेंना कंत्राटदारच का लागतात? याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असंही ते म्हणाले.

विखे साहेब, तुम्ही काय करत आहात?

राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही तुमच्या खात्यातून बलांडेंना कोट्यवधीची कामे दिली. याच उत्तर द्या. विखे पाटील तुम्ही काय करत आहात? आंदोलन सुरू असताना जरांगेंनी तुमच्यावर खालच्या भाषेत टीका केली. उपोषण सोडताना मात्र तुमच्यावर प्रेम करण्याचा संदेश दिला. याच आंदोलनात जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या दिल्या. आणि आता प्रेमाचा संदेश देत आहेत. त्याचं उत्तर विखेंनी द्यावं. विखे नगर जिल्ह्याचे आहेत. विखे साहेब, तुमचा वारसा कुठे? आणि तुम्ही काय करत आहात? असा सवालही त्यांनी केला. विखेंना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर खुशाल मुख्यमंत्री व्हा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.

Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना