Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम 13 मध्ये मास्क सक्ती, कोर्ट रूमबाहेर फलक!

| Updated on: Jul 20, 2022 | 9:40 AM

सध्या राज्यात परत एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. मात्र, राज्यात जरी कोरोना सक्ती नसली तरीही तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम नंबर 13 मध्ये जाणार असाल तर मास्कसोबतच ठेवा. उच्च न्यायालयाच्या रूम नंबर 13 मध्ये मास्क सक्ती करण्यात आलीयं.

Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम 13 मध्ये मास्क सक्ती, कोर्ट रूमबाहेर फलक!
Follow us on

मुंबई : साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाने (Corona) हाहा: कार माजवला होता. देशात झपाट्याने कोरोना रूग्णसंख्या वाढली होती. तसेच कोरोनाने अनेकांचा बळी देखील घेतला. यादरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नियमावली तयार केली होती. या नियमावलीमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाताना किंवा घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाला मास्क (Mask) वापरण्याची सक्ती होती. जर कोणी विदाऊट मास्कचे दिसले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जात असतं. मात्र, आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट झाल्याने अनेक नियम (Rules) शिथिल करण्यात आले.

राज्यातील कोरोनाची नियमावली शिथिल

राज्य सरकारने कोरोनाच्या जवळपास सर्व नियमावलीला शिथिलता दिलीयं. म्हणजे आता सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरण्याची सक्ती नाहीयं. यामुळे लोक मास्क लावत नाहीयेत. मात्र, सध्या राज्यात परत एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. मात्र, राज्यात जरी कोरोना सक्ती नसली तरीही तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रूम नंबर 13 मध्ये जाणार असाल तर मास्कसोबतच ठेवा. उच्च न्यायालयाच्या रूम नंबर 13 मध्ये मास्क सक्ती करण्यात आलीयं. जर तुमच्याकडे मास्क नसेल तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

उच्च न्यायालयाच्या रूम नंबर 13 मध्ये मास्क सक्ती

कोर्टात मास्क न लावल्याने एका पक्षकाराला न्यायालयाने खडेबोल सुनावल्याची घटना घडलीयं. विशेष म्हणजे यांना दोन हजार रूपयांचा दंड देखील लावण्यात आलायं. सध्या उच्च न्यायालयातही मास्क सक्ती नाहीयं. मात्र, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या कोर्ट नंबर 12 मध्ये अजूनही मास्क सक्ती ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासंदर्भातील फलक देखील लावण्यात आले आहे. पक्षकाराच्या नाकावरील रुमाल तोंडावर आल्याने खंडपीठाने संताप व्यक्त केला.