Buldana | हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे उघडले, जलविद्युत निर्मिती संच सुरू होण्याची शक्यता!

या हनुमान सागर धरणावरील वीज निर्मिती संच दोन ते तीन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. वीज निर्मिती संचाची क्षमता 1 हजार 500 किलो वॅट असून यावर 1 हजार किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येते. या संचाची क्षमता दररोज 36 हजार युनिट आहे. यामधून दररोज 20 ते 25 हजार युनिट जनरेट होतात.

Buldana | हनुमान सागर धरणाचे सहा दरवाजे उघडले, जलविद्युत निर्मिती संच सुरू होण्याची शक्यता!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:55 AM

बुलढाणा : बुलढाणा (Buldana) आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या संग्रामपूरच्या हनुमान सागर धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्याने कालपासून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वाननदी पात्रात पाण्याचा 64.85 मी. से विसर्ग सोडण्यात आलाय. हनुमान सागर धरणावरील वीज निर्मिती (Power generation) संच दोन ते तीन दिवसात सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवली जातंय. या संचावरून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला पुरवठा (Supply) करण्यात येतो. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशयानुसार प्रकल्पामध्ये 61.44 टक्के जलसाठा असणे आवश्यक आहे.

धरणातून वाननदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय

धरणातून वाननदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात एकूण 425 मिमी पावसाची नोंद झालीयं. सध्या स्थितीत धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून 404.90 झाली आहे. पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वाननदीला पूर देखील आला आहे. वान नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

दररोज 20 ते 25 हजार युनिट जनरेट

या हनुमान सागर धरणावरील वीज निर्मिती संच दोन ते तीन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. वीज निर्मिती संचाची क्षमता 1 हजार 500 किलो वॅट असून यावर 1 हजार किलो वॅट वीज निर्मिती करण्यात येते. या संचाची क्षमता दररोज 36 हजार युनिट आहे. यामधून दररोज 20 ते 25 हजार युनिट जनरेट होतात. दोन तीन दिवसात हनुमान सागर धरणावरील जलवीज निर्मिती संचावरून 1 हजार किलो वॅट वीज तयार होण्याची शक्यता आहे. वीज निर्मिती संचावरून अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील उपकेंद्राला पुरवठा करण्यात येतो.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.