AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona Update | नाशिक जिल्हात गेल्या 24 तासात 105 कोरोना रूग्णांची नोंद, आरोग्य यंत्रणा अलर्टवर!

राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण सध्या मुंबईमध्ये आहेत तर ठाण्यामध्येही कोरोना रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. त्यामध्येही सध्या पावसाळा सुरू असल्याने कोरोनासोबतच मलेरिया आणि डेंग्यूच्याही रूग्णांमध्ये वाढ झालीयं.

Nashik Corona Update | नाशिक जिल्हात गेल्या 24 तासात 105 कोरोना रूग्णांची नोंद, आरोग्य यंत्रणा अलर्टवर!
| Updated on: Jul 20, 2022 | 8:28 AM
Share

नाशिक : देशात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) पाय पसरवण्यास सुरूवात केलीयं. राज्यात देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. इतकेच नाहीतर नाशिकमधून येणारी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. नाशिक (Nashik) शहर तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. काल दिवसभरात 105 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीयं. यात महानगरपालिका हद्दीतील 47, ग्रामीण भागातील 57 तर जिल्हा बाह्य एक रुग्णाचा समावेश आहे. तसेच दिवसभरात 102 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीयं. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.1 टक्के आहे. तर 610 रुग्णांवर उपचार (Treatment) सुरू आहेत.

नाशिक जिल्हात धोका वाढतोय

राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण सध्या मुंबईमध्ये आहेत तर ठाण्यामध्येही कोरोना रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. त्यामध्येही सध्या पावसाळा सुरू असल्याने कोरोनासोबतच मलेरिया आणि डेंग्यूच्याही रूग्णांमध्ये वाढ झालीयं. नाशिकच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन केले जातयं की, सर्दी, ताप किंवा खोकल्याची समस्या असेल तर लगेचच कोरोनाची टेस्ट करून डाॅक्टरांचा सल्ला घ्या आणि सार्वजनिक ठिकाणी जाताना शक्यतो मास्कचाच वापर करा. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक सक्ती मजबूत करा.

610 रुग्णांवर उपचार सुरू

दिल्लीत मंगळवारी 585 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीयं. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सकारात्मकता दर 4.35 टक्के इतका आहे. यासह, आता एकून कोरोना रूग्णांची संख्या ही 19,44,978 वर गेली आहे, तर मृतांची संख्या 26,296 वर पोहोचली आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या 13,452 कोरोना चाचण्यांमधून नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीत सोमवारी 6.06 टक्के पॉझिटिव्ह दर आणि दोन मृत्यूसह 378 कोरोना प्रकरणे नोंदवली गेली. केरळमध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.