मुंबई महापालिका रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड? महापौर किशोरी पेडणेकरांची सायन रुग्णालयाला अचानक भेट

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (10 जुलै) अचानक सायन रुग्णालयाला भेट दिली (Mayor Kishori Pednekar surprise visit to Sion Hospital).

मुंबई महापालिका रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड? महापौर किशोरी पेडणेकरांची सायन रुग्णालयाला अचानक भेट


मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे (Mayor Kishori Pednekar surprise visit to Sion Hospital). याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (10 जुलै) अचानक सायन रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली. त्याचबरोबर आरोग्य सेवकांशीदेखील संवाद साधला.

किशोरी पेडणेकर यांनी सायन रुग्णालयाच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांचं कौतुक केलं (Mayor Kishori Pednekar surprise visit to Sion Hospital).

“आम्ही आज सायन रुग्णालयातील कोविड वॉर्ड्सची पाहणी केली. कोविड वॉर्डमध्ये रुग्णांची असुविधा होत असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यांचा दावा खरा आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सायन रुग्णालयाला अचानक भेट दिली”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“आम्ही सायन रुग्णालयाच्या 8 क्रमांकाच्या कोविड वॉर्डमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांना सर्वसुविधा मिळतात का? औषधी वेळेवर मिळते का? योग्य उपचार केला जात आहे ना? डॉक्टर आणि नर्सेस चांगली वागणूक देतात का? योग्य काळजी घेतात का? असे प्रश्न विचारले. त्यावर सर्व रुग्णांनी चांगली सुविधा पुरवली जात असल्याचं सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ मुद्दाम घेतला आहे”, असंदेखील महापौर म्हणाल्या.

“रुग्णालयातील काही बाथरुममध्ये अस्वच्छता आढळली. मात्र, यासाठी केवळ महापालिकेला जबाबदार ठरवता येणार नाही. कारण महापालिकेचे कर्मचारी दिवसाला चार वेळा स्वच्छ करतात. मी सर्व रुग्णांना बाथरुममध्ये स्वच्छता ठेवण्याचं आवाहन केलं”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक

“डॉक्टर आणि नर्सेस अतिशय परिश्रम करत आहेत. आज मी पीपीई किट वापरल्यावर समजलं की किती अवघड काम आहे. आपण आपले नाक, डोळे, कान कुठेही हात लावू शकत नाही”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांचीदेखील पाहणी केली. महापालिकेच्या रुग्णालयांची खासगी रुग्णालयांशी तुलना करता येणार नाही. तरीसुद्धा महानगरपालिकेचा अभिमान आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या जास्त आहे. आमचे डॉक्टर आणि नर्सेस रुग्णांना बरे करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत”, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI