मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

| Updated on: Sep 02, 2021 | 10:21 PM

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.

मुंबईत गणेशोत्सव साजरा होणार, पण महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांची बैठक
Follow us on

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अशावेळी मुंबईकरांनी आतापर्यंतच्या दोन्ही लाटेमध्ये चांगले सहकार्य केले आहे. त्याचपद्धतीने सहकार्य करून कोरोनाविषयक सर्व नियम पाळून आपण गणेशोत्सव साजरा करूया, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या. (Meeting of Mumbai Mayor Kishori Pednekar with Ganesh Mandals)

पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील गणेशमंडळाच्‍या वतीने समन्‍वय समितीने मांडलेल्‍या सूचनांचे निराकरण करणे हा मुख्‍य उद्देश बैठक आयोजित करण्‍यामागे असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच गणेश मंडळाचा महापालिकेसोबत असलेला सुसंवाद अधिक चांगला करण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी दुपारी तीन ते पाच या वेळेत विभाग कार्यालयात उपस्थित राहावे. तसंच गणेश मंडळांच्या परवानगीचे सर्व कामे पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

गणेशमूर्तीचं आगमन व विसर्जनापर्यंत सर्व उपाययोजना

गणपतीच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरुन घ्यावे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय ठेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवतील. गणेशमूर्तीचं आगमन व विसर्जन व्‍यवस्थित व्‍हावे म्‍हणून सर्व ती उपाययोजना कराव्‍यात. तसंच धोकादायक उड्डाणपुलांवरुन ये-जा होणाऱ्या मूर्तींना कोणत्‍याही दुर्घटना होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्‍याचे निर्देशही महापौरांनी या बैठकीत दिले. त्यासोबतच गणेश मंडळांनी मंडपासाठी केलेले खड्डे बुजविण्याची सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्यासोबतच डेंग्यू, मलेरियाची साथ लक्षात घेता प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूर फवारणी करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे जे दिशा- निर्देश देण्यात आले आहे, त्याचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक होणार

सभागृह नेते विशाखा राऊत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, विभाग कार्यालयात गणेश मंडळांच्या परवानग्यांसाठी नेमणूक करण्यात आलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील नोडल अधिकाऱ्यांनी आपला भ्रमणध्वनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्यावा. जेणेकरून मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सोयीचे होईल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबांवकर, तोंडवळकर, बाळासाहेब कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन करताना काही सूचना केल्या. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

इतर बातम्या :

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

मुंबईतून तडीपार, ‘त्या’ दोन महागड्या मोबाईलने सराईत चोरट्याचे बिंग फोडले, अनेक गुन्ह्यांचा उकल

Meeting of Mumbai Mayor Kishori Pednekar with Ganesh Mandals