मुंबईतून तडीपार, ‘त्या’ दोन महागड्या मोबाईलने सराईत चोरट्याचे बिंग फोडले, अनेक गुन्ह्यांचा उकल

डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे हा आरोपी चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या सुमारास शहरात फिरत होता.

मुंबईतून तडीपार, 'त्या' दोन महागड्या मोबाईलने सराईत चोरट्याचे बिंग फोडले, अनेक गुन्ह्यांचा उकल
मुंबईतून तडीपार, 'त्या' दोन महागड्या मोबाईलने सराईत चोरट्याचे बिंग फोडले, अनेक गुन्ह्यांचा उकल

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे हा आरोपी चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या सुमारास शहरात फिरत होता. त्याला पोलिसांनी बरोबर हेरत जेरबंद केलं. पोलिसांनी सुरुवातीला त्याला हटकलं होतं. पण पोलिसांना चोरट्याच्या हालचालींवर संशय आला. त्याची विचारपूस केली असता संशय बळावल्याने अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

डोंबिवलीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ

डोंबिवलीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपासून पोलिसांनी या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवली आहे. डीपीसी विवेक पानसरे, एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. प्रत्येक गुन्ह्यातील आरोपी लवकरात लवकर सापडले पाहिजेत यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना ताकीद देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोबाईल दुकानात चोरीची घटना समोर आली होती. चोरट्याने एका मोबाईल दुकानातून तब्बल 7 महागडे मोबाईल चोरी केले होते. संबंधित चोरीची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली होती. या चोरीच्या घटनेनंतर रामनगर पोलीस चांगलेच अलर्ट झाले होते.

सराईत चोर पोलिसांच्या हाती

या दरम्यान 30 ऑगस्टला रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना एक तरुण पोलिसांना संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला हटकलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल सापडले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता आरोपीचं बिंग फुटलं. संबंधित तरुण हा दुसरा-तिसरा कुणी नसून 30 वर्षीय सराईत चोर सूरज रामदास चव्हाण असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या चोराने डोंबिवलीत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत.

चोरट्याविरोधात तब्बल 16 गुन्हे दाखल

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दीपक दाभाडे यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी सूरजने डोंबिवलीत 28 ऑगस्टला महावीर या मोबाईल शोरुमध्ये महागड्या मोबाईलची चोरी केली होती. सूरजने डोंबिवलीत पाच घरफोडी केल्याचं आतापर्यंत उघडकीस आलं आहे. तसेच तो सराईत गुन्हेगार आहे. मुंबईत त्याच्या विरोधात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मुंबईत तो तडीपार होता. तो गेल्या काही दिवसांपासून खडवलीत राहत होता. सूरजने आणखी किती गुन्हे केले याचा तपास सध्या सुरु आहे, अशी माहिती दीपक दाभाडे यांनी दिली.

पुण्यात भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न

दुसरीकडे पुण्यात आज (2 सप्टेंबर) भर दिवसा घरफोडीची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही पुण्यातील खडक पोलीस ठाणे हद्दीत घडली. विशेष म्हणजे चोरट्याला चोरी करताना एका तरुणाने बघितलं. त्यानंतर चोरटा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी त्या तरुणाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोराने तरुणावर गोळीबार केला. तरीही तरुणाने जखमी अवस्थेत चोराला पकडलं. विशेष म्हणजे भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न केला जात असल्याने परिसरात एकच खबबळ उडाली आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सव तोंडावर, रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब, आरोपीचा नेमका कट काय?

ते धूम स्टाईलने दुचाकीवर आले, शिक्षिका कारमध्ये जात असतानाच मोठा गदारोळ, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI