सर्वाधिक रुग्णसंख्येच्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावा, केंद्राच्या महाराष्ट्रासह केरळला कोरोनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना

केंद्र सरकारनं केरळ आणि महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण अधिक असेल तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रानं सांगितलं आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्येच्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावा, केंद्राच्या महाराष्ट्रासह केरळला कोरोनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना
CORONA
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 1:07 PM

मुंबई: महाराष्ट्र आणि केरळमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारनं केरळ आणि महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण अधिक असेल तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रानं सांगितलं आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला दोन्ही राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत विशेष सूचना देण्यात आल्या.

केंद्रानं राज्य सरकारला नेमंक काय सांगितलं?

केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम, कोविड सुसंगत वर्तणूक याचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्गाचा दर आहे तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.

सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत आहे. राज्य सरकारकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यातील काही कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाची स्थिती कशी?

महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे.

राज्यातील या पाच जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची रुग्णसंख्या 64 लाख 47 हजार 442 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 62 लाख 55 हजार 451 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर, राज्यातील कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 900 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 574 वर पोहोचला आहे.

इतर बातम्या:

राज्यातील 5 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन कायम, सर्वाधिक सक्रिय रुग्ण ‘या’ जिल्ह्यात

सुप्रीम कोर्टाची ईडी, सीबीआय कारवाईवर शंका; नवाब मलिक म्हणतात, याचा अर्थ सूडभावनेनेच कारवाई

MHA advised Maharashtra and Kerala impose night curfew in high cases areas of two states

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.