AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?

मुंबई बँकेत शिवसेना नेते मिलींद नार्वेकरांनी (Milind narvekar) सत्ता परिवर्तनासाठी मोठी फिल्डींग लावली होती, त्यामुळे हे सत्ता परिवर्तन शक्य झाले आहे.

मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?
मिलिंद नार्वेकर
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jan 13, 2022 | 6:18 PM
Share

राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत मुंबई बँकेत (Mumbai bank Election) भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे, शिवसेना नेते मिलींद नार्वेकरांनी (Milind narvekar) सत्ता परिवर्तनासाठी मोठी फिल्डींग लावली होती, त्यामुळे हे सत्ता परिवर्तन शक्य झाले आहे आणि राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्ष झाले आहेत. भाजपकडून प्रसाद लाड यांना मैदानात उतरवण्यात आले होते, मात्र नार्वेकरांनी त्यांना चेकमेट देत मुंबई बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे. मुंबई बँकेत आतापर्यंत अनेक राजकीय पक्ष एकत्र येताना दिसले. आधी प्रवीण दरेकरांच्या उमेदवारीवरून आधी वाद झाला, त्यांनी वेगळ्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यानंतर सहकार खात्याने त्यांना अपात्र केले, त्यामुळे दरेकरांचा नाईलाज झाला. निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. याचवेळी हे प्लॅनिंग झाल्याची चर्चा आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीने आधीपासून दबाव बनवला

आतापर्यंत मुंबई बँकेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची एकहाती पकड होती, दरेकरांवर वारंवार शिवसेना आणि सरकारवर टीका होताना दिसून येत आहेत. त्यामुळे अशा प्रमुख नेत्यांना धक्का देण्यासाठी मिलींद नार्वेकर मैदानात उतरले होते. या बँकेत जरी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असले तरी महाविकास आघाडील सर्व पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. मुंबई बँकेवर होल्ड असणे म्हणजे मोठ्या आर्थिक केंद्रवर पकड असण्यासारखे आहे. त्यामुळेच नार्वेकरांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या तोंडावर मोठा दणका

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, बँकेतील हे सत्तांतर भाजपला मोठा झटका देऊन गेले आहे. मुंबई बँकेत आपर्यंत जे घोटाळे झाले, तसे न होऊ देता, मुंबईकरांची सेवा करण्याचा आणि बँकेच्या भरभरासाठी महाविकास आघाडीचे नवे संचालक मंडळ करणार असल्याचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांसी बोलताना सांगितले तसेच सिद्धार्थ कांबळे हे पुढील एक वर्षाकरीता अध्यक्ष राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुश्रीफांना का नकोय नगरचे पालकमंत्रिपद? म्हणतात जबाबदारीतून मुक्त करा…

‘वरच्या स्थानी कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नाहीत’, शरद पवारांचे भाजपवर शरसंधान

नॉटरिचेबल नितेश राणे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, नितेश राणे इतके दिवस होते कुठे?

Follow Us
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ