नॉटरिचेबल नितेश राणे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, नितेश राणे इतके दिवस होते कुठे?

भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहे, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉट रिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता.

नॉटरिचेबल नितेश राणे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, नितेश राणे इतके दिवस होते कुठे?

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. आज नितेश राणे दाखल होताच भाजपच्या (Bjp) स्थानिक कार्यकर्तांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यांनंतर दमदार अंदाजात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, भाजपने मोठा विजय नोंदवला, मात्र तरीरी नितेश राणे अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे कुणासमोरही आले नव्हते. आता मात्र न्यायलयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने नितेश राणे तब्बल 15 दिवसांनी समोर आले, राणे इतके दिवस कुठे अज्ञातवासात होते, हे मात्र अजूनही कुणाला कळाले नाही.

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे नितेश राणेंकडून अभिनंदन

शिवसेनेला धक्का देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँक काबीज केली, त्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नितेश राणे यांनी थेट जिल्हा बँकेत दाखल होत अध्यक्ष उपाध्यांचे अभिनंदन केले. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातला राणेंचा विजय चांगलाच चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयात नितेश राणेंची भूमिका निर्णयक राहिली आहे. मात्र संतोष परब प्रकरणाचा ससेमिरा मागे लागल्यानंतर राणे कुठेच दिसले नाही. भाजपचा विजय झाला तरी तो विजय साजरा करण्यासाठीही नितेश राणे नव्हते, त्यानंतर आज ते थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाल्याचे दिसून आले.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे, त्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टत हे प्रकरण पोहोचले आहे, राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता हायकोर्टात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Nawab malik : राणेंनी गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही-नवाब मलिक

संजय राऊत आणि टिकेत यांच्यात काय चर्चा? निवडणुकीत कुणाला पाठिंबा? टिकेत म्हणतात…

शेतकरी, ST कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी पैसा नसतो, आमदाराच्या माफीसाठी कसा? केशव उपाध्येंचा सवाल

Published On - 3:56 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI