
“उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय, गिरणी कामगारांना धारावी पूनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात. ज्या जागा तुम्ही, अदानीला दिल्या आहेत. त्यात गिरणी कामागारांना सुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे” अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली. “मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. तसं नसेल तर मुंबईतले मोठे भूखंड अदानीला का देत आहोत” असा सवाल त्यांनी केला.
“धारावी संदर्भात आपण टीडीआर त्यांना दिला आहे. धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे. याशिवाय मदर डेअरीपासून, दहीसर, मुलुंडेच टोल नाके मिठागर असे अनेक भूखंड त्यांना दिले आहेत. मुंबईचा गिरणी कामगार इथला भूमिपूत्र आहे. मराठी माणसू आहे. आमची मागणी कायम राहिलं. यांना मुंबईच्या बाहेर न टाकता, यांना धारावी पूर्नवसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय
“हा मराठी माणसाचा आवाज आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहतील. तिथे मार्गदर्शन करतील. शिक्षकांचे प्रश्न आहेतच. हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय. सरकार करतय काय हा गंभीर प्रश्न आहे. गिराणी कामगारांच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे गिरणी कामगाराच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
कॅन्टीन कर्मचाऱ्याला आमदाराकडून मारहाण
आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यावर संजय राऊत बोलले. “जर डाळ खराब असेल, तर त्याला जबाबदार कोण? याला तुमचं सरकार जबाबदार आहे. ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाड्यांवर, गोरगरीबांच्या घरात मिळते. मोदी फुकटच धान्य वाटतायत, सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा” असं संजय राऊत म्हणाले.
ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत
“फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला डाळ, भात मिळाला नाही. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही मारहाण करण्याआधी विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता होता” असं संजय राऊत म्हणाले.