सनसनाटी आणि धांदात खोटे आरोप… अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Minister Dhananjay Munde reaction on Anjali Damania : कृषी साहित्य खरेदीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. त्यावर आता तितक्याच ताकदीने मुंडे यांनी पलटवार केला आहे.

सनसनाटी आणि धांदात खोटे आरोप... अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
धनंजय मुंडे, अंजली दमानिया
| Updated on: Feb 04, 2025 | 2:41 PM

कृषी साहित्य खरेदीत मोठा घोटाळा केल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ठेवला. बोगस कृषी विमा, हार्वेस्टर घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच दमानिया यांनी मुंडेंवर पुन्हा बॉम्बगोळा टाकला. ते कृषी मंत्री असताना तब्बल पावणे तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर आता तितक्याच ताकदीने मुंडे यांनी पलटवार केला आहे.

थेट पहिली प्रतिक्रिया काय?

साहित्य खरेदीबाबत मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझ्यावर आरोप केले. हे पुन्हा एकदा त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धांदात खोटे आरोप करणं यापलिकडे यात काही नाही, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.

संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणे

मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही संपूर्ण पणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला अनुसरून राबवली आहे. आज नाही. मागच्या ५० दिवसात त्या माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. एक आरोप असाच केला होता की, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात. काही आरोपींचा मर्डर झाला असा आरोप केला होता. सनसनाटी आरोप करायचे धांदात खोटे आरोप करायचे आणि स्वत:ची प्रसिद्ध करायची. यापलिकडे काही दिसत नाही, असा आरोप मंत्री मुंडे यांनी केला.

माझ्यावर मीडिया ट्रायल

आज ५८ वा दिवस आहे. माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यांनी जे आरोप केले, डीबीटीत काय असावे नसावे याचा अधिकार नियमातील तरतुदीनुसार कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आहेत. या प्रक्रियेतही याच कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्र्यांच्या समोर बाब सादर करून त्यांच्या पूर्व मान्यतेने प्रक्रिया अंतिम केली आहे, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला.

अंजली ताई शेतकरी आहेत का?

अंजली ताई शेतकरी आहे की नाही माहीत नाही. शेतीपूर्वी काही मशागत करावी लागते. पेरणी आणि उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी कराव्या लागतात. एप्रिल आणि मे महिन्यात लागणारी आचार संहिता आणि जूनमधील खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निडवणुकीच आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया मार्चमध्ये केली आहे, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले.