AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांची आरोपांची लड, कृषी खात्यातील भ्रष्टचाराची वाचली यादी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

Agriculture Scam Anjali Damania on Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी खात्याची आज आब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोटाळ्याची लडच लावल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा ८८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांची आरोपांची लड, कृषी खात्यातील भ्रष्टचाराची वाचली यादी, धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत
धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ, आता उत्तर देणार का?
| Updated on: Feb 04, 2025 | 11:44 AM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्याची अब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी घोटाळ्याचा धडाकाच लावल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध घोटाळ्याची मालिकाच समोर आणली. एकामागून एक यादीच वाचून दाखवली. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे कृषी विभागाची लक्तरं टांगल्या गेली. त्यांनी आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही असा सवाल केला.

घोटाळ्याची मालिका

नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाळाच घोटाळ झाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. आता तरी भ्रष्टाचार समोर आला आहे. भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

भ्रष्टाचार म्हणतो, पण तो किती पट झाला हे दिसेल. या सर्वांचे दर दाखवते. नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो युरिया १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ५०० रुपये मिळतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या, असा आरोप दमानिया यांनी केला.

आता नॅनो डीएपी, याची किंमत ५२२ रुपये एक लिटर. म्हणजे ५०० मिलिलीटरला ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ बॉटल घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये. कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी घाई-घाईने स्वाक्षरी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

नॅनो डीएपी, नॅनो युरियाचा घोटाळा ८८ कोटींचा

बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं. ते ३४२६ रुपयाला ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले. म्हणजे ५ लाखाहून अधिक लाभार्थी होणार होते. बजेट फिक्स होते. लाभार्थी कमी केली. २ लाख ३६ हजार ४२७ बॅटरी स्पेअर घेतले. किंमत होती ३४२५ रुपये होती.

मेटाल्डे हाईड गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड प्रोडक्ट आहे. बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या प्रोडक्टचा दर ८१७ रुपयाला मिळतंय. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं.

कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले. मी ऑनलाइनच्या रेटने म्हणतेय. बल्कने पकडलं तर २० टक्के अधिक आहे. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...