Sunetra Pawar: नाराजीच्या चर्चा, बैठकांचे सत्र, कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वीच विखे पाटील देवगिरीवर, सुनेत्रा पवारांची भेट, काय खलबतं?

Radhakrishna Vikhe Patil Meet DCM Sunetra Pawar : राष्ट्रवादीत मोठी खलबतं सुरू आहेत. नाराजीच्या बातम्यांदरम्यान बैठकांचे सत्र सुरू आहे. थोड्याच वेळात कोअर कमिटीची बैठक होत आहे, त्यापूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देवगिरीवर पोहचले. काय आहे अपडेट?

Sunetra Pawar: नाराजीच्या चर्चा, बैठकांचे सत्र, कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वीच विखे पाटील देवगिरीवर, सुनेत्रा पवारांची भेट, काय खलबतं?
राधाकृष्ण विखे पाटील देवगिरीवर,सुनेत्रा पवारांची घेतली भेट
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Nov 04, 2026 | 10:06 AM

Radhakrishna Vikhe Patil Meet DCM Sunetra Pawar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत अधूनमधून भूकंप सुरूच आहे. आता तर वाद थेट दिल्ली दरबारी पोहचल्याचे वृत्त समोर आले. पार्थ पवारांच्या काही निर्णयावर वरिष्ठांनी नाराजी व्यक्त करत दिल्ली गाठल्याचा दावा करण्यात येत आहे. तर पक्षात नाराजांची फळी तयार होत असल्याचा आरोप होत असताना काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात देवगिरीवर बैठक झाली. पण त्याला काही आमदारांनी दांडी मारल्याचे समोर आले. आज सकाळीच पुन्हा कोअर कमिटीची बैठक घेण्यात येत आहे. त्यापूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देवगिरीवर दाखल झाल्याने पडद्यामागे काय सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील देवगिरीवर

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती समोर आली नाही. पण सध्या राष्ट्रवादीत इतक्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच ही भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादीने विकास निधीसोबतच अर्थखाते पुन्हा पक्षाकडे देण्याची मागणी केली आहे. विकास निधीबाबत काही आमदारांची नाराजी आहे. तर विधान परिषद निवडणूकीपासून इतर काही निर्णयात भाजपचा हस्तक्षेप वाढल्याचा तक्रारीचा सूरही कालच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आळवण्यात आला. यावर आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे. युवा आमदार आणि पक्षातील ज्येष्ठ सदस्यांमध्ये सुद्धा खडाजंगी झाल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

सदिच्छा भेट नाही मोठी खलबतं

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षात वादंग सुरू असल्याचे समोर आले. भाजप आणि शिंदे सेनेतील कुरबुर चव्हाट्यावर आली. तर काही ठिकाणी शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील अतंर्गत कलह ही समोर आला. रायगड, खानदेशात दोन्ही पक्षातील कलगीतुरा नवीन नाही. त्यामुळे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची हे केवळ सदिच्छा भेट नसून त्यामागे काही महत्त्वाची बाब असल्याचा दावा करण्यात येत आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. आता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर काय निर्णय होतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us