मुंबई लोकलमधून खासगी सुरक्षारक्षकांनाही प्रवासाला मुभा, राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेची परवानगी

भारतीय रेल्वे विभागाने आता मुंबईतील खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे.

मुंबई लोकलमधून खासगी सुरक्षारक्षकांनाही प्रवासाला मुभा, राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेची परवानगी


मुंबई : भारतीय रेल्वे विभागाने आता मुंबईतील खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला. लोकलने प्रवास करण्यासाठी संबंधित खासगी सुरक्षारक्षकांना गणवेशात यावं लागणार आहे. तसेच आपलं मान्यताप्राप्त ओळखपत्र देखील दाखवावं लागणार आहे (Ministry of Railways allows Private Guards with uniform to travel in Mumbai Local).

रेल्वे विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, ” राज्य सरकारने 19 ऑक्टोबर 2020 रोजी पाठवलेल्या पत्रातील विनंतीनंतर रेल्वे विभागाने खासगी सुरक्षारक्षकांना प्रवासाला परवानगी दिली आहे. गणवेशात असणारे सुरक्षारक्षक मुंबई लोकलने प्रवास करु शकतील. त्यांनी राज्य सरकारकडून लवकरात लवकर त्यांच्या प्रवासासाठी क्युआर कोड मिळवावा. क्युआर कोड उपलब्ध होईपर्यंत गणवेशातील सुरक्षारक्षकांना ओळखपत्र दाखवून रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकिट काऊंटर सुरु करण्यात येतील.”

रेल्वे विभागाचं प्रवाशांना आवाहन

राज्य सरकारने परवागनी दिलेले प्रवासी आणि सर्व महिला (सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता) या व्यतिरिक्त नागरिकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी करु नये, असं आवाहन रेल्वे विभागाने केलं आहे. तसेच सर्व प्रवाशांना प्रवास करताना कोव्हिडशी संबंधित वैद्यकीय आणि सामाजिक नियमांचं पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सरसकट सर्व महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य महिला लोकल प्रवास करत आहेत. सरकारच्यावतीनं महिलांना प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजेनंतर लोकल बंद होण्यापर्यंत प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

हेही वाचा :

सर्वसामान्य महिलांसाठी आजपासून लोकल प्रवास, पण वेळमर्यादेचा फायदा कुणाला? महिलावर्गाचा सवाल

मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा, पीयूष गोयल यांचे ‘नवरात्री’ गिफ्ट

महिला भाज्या आणायला लोकलमधून जाणार नाहीत; अस्लम शेख यांनी रेल्वेला खडसावलं

व्हिडीओ पाहा :

Ministry of Railways allows Private Guards with uniform to travel in Mumbai Local

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI